मुंबई लोकल रेल्वे स्थानकांवरील गर्दी लवकरच कमी होणार, 36 स्थानकांवर होणार मोठे बद्दल
Mumbai local Train : मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. लोकल ट्रेन दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवते. त्यामुळे स्थानकांवरील गर्दी ही एक मोठी समस्या बनली आहे. या समस्येवर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाने 'अमृत भारत मिशन' अंतर्गत मुंबईतील 36 स्थानकांवर सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी 1,810 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत, रेल्वे स्थानके अधिक सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच या सुधारणा केवळ स्थानकांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीत तर प्रवाशांच्या एकूण प्रवास अनुभवात सुधारणा करण्यासाठी आहेत. स्थानकांवरील जागा वाढवून आणि सुविधांमध्ये सुधारणा करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रवाशांना मिळणार आरामदायी सुविधा
मुंबईच्या स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेता प्रवासी वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या विविध पैलूंवर काम होणार आहे. यामध्ये आधुनिक साइनबोर्ड आणि सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, प्रवेश आणि निर्गमन मध्ये सुधारणा करणे आणि विकलांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करणे आहे. यासोबतच ऊर्जा बचत करणारी प्रकाश व्यवस्था आणि पाण्याची बचत करणाऱ्या सुविधा बसवण्यात येणार आहे.
सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या पाच स्थानकांवर 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या पाच स्थानकांवर 25 ते 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्थानकांमध्ये परेल, माटुंगा, शहाड, घाटकोपर रोड, लाइन्स रोड आणि जोगेश्वरी यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "असुविधा कमी करण्यासाठी आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आम्ही शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत. लवकरच सर्वांना चांगला आणि स्वच्छ प्रवास अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. देशभरातील 132 स्थानके आधीच पूर्ण झाली आहेत."
नवीन एसी लोकल सेवा
सेंट्रल रेल्वेने 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकल सेवा सुरू केल्या आहेत. यामुळे आठवड्याच्या दिवसांत एसी लोकल सेवा 66 वरून 80 वर गेल्या आहेत. ही सेवा उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आता, रेल्वे प्रवाशांना या कडक उन्हात एसी लोकल ट्रेन मिळतील की नॉन-एसी ट्रेनमध्ये प्रवास करावा लागेल याची चिंता करण्याची गरज नाही. एसी लोकल ट्रेनची संख्या वाढल्याने प्रवास करणे निश्चितच पूर्वीपेक्षा सोपे आणि आनंददायी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications