Mumbai Local: मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 'या' तारखेला सेंट्रल लाईनवर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega block : जनवाहिनी आणि मुंबईकरांचा श्वास म्हणजे लोकल...ही सेवा ठप्प झाली तर मुंबईच थांबते. याच मुंबई लोकल ट्रेनबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. मंगळवारी मुंबई लोकल ट्रेनचे अपडेट शेअर करताना, मध्य रेल्वेने सांगितले की, कल्याण आणि बदलापूर स्थानकांदरम्यानच्या सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजचे (ROB) गर्डर काढण्यासाठी त्यांनी 29 मार्च रोजी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.
29 मार्च 2025 च्या रात्री ते 30 मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या या ऑपरेशनमध्ये किलोमीटर 62/880 येथे दोन रोड क्रेन वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे, 30 मार्च रोजी पहाटे 1:30 ते पहाटे 4:30 पर्यंत चालणाऱ्या या ब्लॉक दरम्यान, अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या कर्जत- पनवेल-दिवा या मार्गे जातील.

यामध्ये भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस, हॉस्पेट-सीएसएमटी एक्सप्रेस आणि चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी काय..?
कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण येथे नियोजित थांब्या असलेल्या गाड्या ठाण्यात थांबतील. याशिवाय, सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस आणि तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस नियमितपणे काही काळ वांगणी आणि नेरळ स्थानकावर थांबतील.
- ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत दरम्यान कोणतीही सेवा उपलब्ध नाही.
- काही लोकल ट्रेन एकतर त्यांचे मार्ग वाढवतील, जसे की परळ-अंबरनाथ लोकल जी बदलापूरपर्यंत धावेल किंवा त्यांचा प्रवास लहान केला जाईल.
- CSMT-बदलापूर आणि CSMT-कर्जत लोकल सेवा अंबरनाथ येथे संपेल.
- याशिवाय, कर्जत-सीएसएमटी ही विशेष ट्रेन चालेल, जी कर्जतहून सकाळी 4:10 वाजता सुटेल आणि 6:08 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
- रेल्वेच्या महत्वाच्या कामांसाठी या गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रकात काहीसा बदल झाला आहे मात्र, हा बदल तात्पुरता आहे.












Click it and Unblock the Notifications