Mumbai Local : पश्चिम रेल्वे मार्गावर आज 31 मे उद्या 1 जून रोजी 36 तासांचा ब्लाॅक! 162 लोकल रद्द
Mumbai Local 36-hour block on Western Railway line : पश्चिम रेल्वे मार्गावर आज शनीवारी 31 मे रोजी दुपारी दोन ते रविवारी 1 जून रोजी मध्यरात्री 1 वाजेदरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांता ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या काळात जवळपास 162 लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
लोकल मार्गावर देखभार दुरुस्तीची कामे रविवारी केली जातात, अशातच ब्लाॅकही घेतले जात आहेत.रविवारी प्रवाशी इतर दिवसांच्या तुलनेत कमी असतात, सुटीचा दिवस असल्याने या दिवशीची निवड केली जाते.

कांदीवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लाॅक घेतला जाईल. याप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहारदरम्यान येणाऱ्या आणि जाणाऱ्या स्लो मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या कालाधीत मेगाब्लाॅक घेतला जाणार आहे. सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या स्लो लोकर गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने दिले आहे.
आज किती लोकलवर परिणाम
मिडिया रिपोर्टनुसार, शनीवारी म्हणजेच आज 31 मे रोजी जवळपास 73 लोकल रद्द होणार आहेत, तर रविवारी 89 लोकल रद्द होणार आहेत. यासह चार एक्सप्रेस शार्ट टर्मिनेट करण्यात येतील अशी माहिती आहे.
दुसरीकडे मध्य रेल्वेमार्गावर या ब्लाॅकच्या कळात मज्जिद, सॅण्डहर्स्ट रोड, करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकादरम्यान लोकल प्रवाशांसाठी उपलब्ध नसतील.
हार्बर मार्गावर उद्या काय राहणार स्थिती
- हार्बर मारगावर रविवारी म्हणजेच 1 जून रोजी सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लाॅक राहील.
- या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा आणि वाशी ते बेलापूर-पनवेल तसेच सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावरील लोकल सेवा सकाळी 11.16 ते 4.40 पर्यंत बंद राहील.
- या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील अशी माहिती समोर आली आहे.












Click it and Unblock the Notifications