मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 238 एसी लोकल ट्रेन मिळणार, सामान्य कोचमध्ये कधी लागणार अॅटोमॅटीक गेट? वाचा
Mumbai Local 238 AC trains : मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. जवळपास २३८ लोकल एसी ट्रेन मुंबईकरांना मिळणार आहे. त्यामुळे आता लोकल ट्रेनचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
यासह एसी नसलेल्या रेल्वेच्या डब्ब्यात स्वंयचलीत दरवाजेही लावले जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यातपर्यंत मुंबई लोकल ट्रेनसाठी स्वयंचलित दरवाजे बंद करण्याचे दोन नमुने तयार होतील असे वृत्त वनइंडिया हिंदीने दिले आहे.

मुंबईत मुंब्रा येथे ९ जून रोजी दोन रेल्वेगाड्या एकमेकांना घासून लोकलमधील प्रवासी कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातानंतर मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारही गंभीर झाले आहे, लोकलमध्ये असलेली गर्दी आणि प्रवाशांना होणारा त्रास याची मुंब्रा अपघातानंतर बरीच चर्चा झाली होती. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईकरांना एसीसह स्वंयचलित दरवाजे बसवले जातील असे म्हटले होते.
वनइंडियाने वृत्त दिल्यानुसार, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सतीशकुमार यांनी म्हटले की, मुंबईत २३८ लोकल वातानुकुलीत ट्रेन वाढवण्याच्या प्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकरच निविदा जारी केली जाईल.कुमार यांनी म्हटले की, "निवदा थांबली ही माहिती चुकीची आहे, सर्व प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यात आले आहेत. लवकरच निविदा जारी होणार आहे."
डिसेंबर
कोचमध्ये ऑटोमॅटिक गेट्स कधी बसवले जातील?
'मिड डे' ला दिलेल्या मुलाखतीत सतीश कुमार म्हणाले की, ऑटोमॅटिक गेट क्लोजिंग असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेनचे दोन प्रोटोटाइप डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. हे प्रोटोटाइप चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) च्या उत्पादकांकडून विकसित केले जात आहेत.
लोकल ट्रेनमध्ये कोणते तीन मोठे बदल होणार ?
लोकल ट्रेनमध्ये तीन मोठे बदल केले जात आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकल ट्रेनमध्ये तीन मुख्य बदल समाविष्ट करून एक नवीन डिझाइन अंतिम केली आहे. यामध्ये पहिले म्हणजे ऑटोमॅटिक गेट्स, दुसरे म्हणजे चांगल्या हवेच्या अभिसरणासाठी छतावरील वेंटिलेशन युनिट्स आणि तिसरे म्हणजे कोचमध्ये इंटरकनेक्टिंग व्हेस्टिब्यूल यांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications