Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईत 'या' विमानाचे इर्मजन्सी लॅंडिंग; केबिन प्रेशर अन् 7 प्रवाशांचा जीव गुदमरला, कसा घडला थरार?

Mumbai airport emergency landing : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला गेला. त्यानंतर देशभरातील विमान कंपन्यांकडून आवश्यक ती विशेष काळजी घेतली जात आहेत. अशातच, मुंबई विमानतळावर एका विमानाला इर्मजन्सी लॅंडिंग करण्याची घटना समोर आली आहे.

विमानातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तसेच विमानात अचानक केबिन प्रेशरमुळे अडचण निर्माण झाल्याचे सांगितले गेले. चला तर जाणून घेऊया, हे विमान कोणत्या कंपनीचे होते, कोठून कुठे चालले होते आणि पायलटने अचानक असा निर्णय का घेतला या विषयी सर्व काही जाणून घेऊया..!

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला येणाऱ्या इथिओपियन एअरलाइन्सच्या ET640 या विमानाला शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले. विमानात केबिन डिप्रेशरायझेशनची (हवेच्या दाबाचा अभाव) गंभीर समस्या उद्भवू लागल्याने हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यामुळे 7 प्रवाशांची प्रकृती बिघडली. धक्कादायक म्हणजे, विमानातील एका प्रवाशाची प्रकृती इतकी बिघडली होती की, त्याला अखेर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान अरबी समुद्रावरून सुमारे 33,000 फूट उंचीवर उड्डाण करत असताना ही घटना घडली. या काळात अचानक केबिनचा दाब सामान्यपेक्षा कमी झाला, ज्यामुळे विमानात बसलेल्या अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे आणि अस्वस्थता येत असल्याची तक्रार येऊ लागली.

Mumbai Latest News

वैमानिकाने त्वरीत घेतला निर्णय अन् उतरवले विमान

Flightradar24 कडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानात डिप्रेशरायझेशनची माहिती मिळताच वैमानिकांनी तातडीने निर्णय घेतला आणि विमान कमी उंचीवर आणले आणि नंतर ते मुंबई विमानतळाकडे वळवले. मुंबईत रात्री 1:42 वाजता विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर, विमानतळावरील वैद्यकीय पथकाने आजारी प्रवाशांना तातडीने प्राथमिक उपचार दिले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, आजारी पडलेल्या 7 प्रवाशांपैकी एकाला गंभीर स्थितीत रुग्णालयात पाठवण्यात आले, तर उर्वरित प्रवाशांवर विमानतळावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तथापि, या संपूर्ण प्रकरणाची अद्याप एचटी किंवा इतर सूत्रांनी स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. इथिओपियन एअरलाइन्स किंवा मुंबई विमानतळ प्राधिकरणाने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

काही दिवसांपूर्वीही घडला होता असाच प्रकार!

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी 24 जून रोजी लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 130 मध्ये पाच प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स अचानक आजारी पडले. त्या फ्लाइटमध्ये अन्नातून विषबाधा होण्याची लक्षणे दिसून आली, ज्यात उलट्या, मळमळ आणि चक्कर येणे यांचा समावेश होता. या प्रकरणात, एअर इंडियाने पुष्टी केली होती की, विमान उतरल्यानंतर आजारी प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना वैद्यकीय मदत देण्यात आली होती. तथापि, नंतर त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला.

डिप्रेशन किंवा सिस्टम बिघाडाचे नेमके कारण काय?

एका एअरलाइन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते की, केबिन प्रेशरमध्ये हळूहळू घट (स्लो डीकंप्रेशन) हे देखील याचे कारण असू शकते. हे कारण आता इथिओपियन एअरलाइन्सच्या घटनेशी जोडलेले दिसते. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अलीकडेच देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर अचानक सुरक्षा तपासणी केली. या तपासणीत अनेक सुरक्षा उल्लंघने आणि त्रुटी उघडकीस आल्या.

त्यानंतर DGCA ने एअरलाइन्स आणि विमानतळ व्यवस्थापनाला एका आठवड्यात सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या काही दिवसांत, केबिन प्रेशरशी संबंधित दोन प्रमुख घटना चिंतेचा विषय बनत आहेत. यावरून असे दिसून येते की विमान कंपन्यांना त्यांच्या तांत्रिक तपासणी प्रक्रिया, क्रू तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+