Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Hit and Ru! बॅनर लावायला गेलेल्या मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या दोघांना BMW कारनं उडवलं, 1 ठार

Mumbai Hit and Run : मुंबईत वरळीत हिट अँड रनची घटना घडल्यानंतर आता पुन्हा मुलुंड परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बॅनर लावायला गेलेल्या दोघांना बीएमडब्ल्यू कारनं उडवलं असून त्यातला एकजण ठार झाला आहे, तर दुसरा जखमी झाल्याचं वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, बीएमडब्ल्यूनं धडक दिलेले दोघे मुलुंडचा राजा गणेश मंडळाचे सदस्य असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचंही सुत्रांनी सांगितलं.

Mumbai Hit and Run

मुंबईत गणेशोत्वाची कालपासून धुम सुरु झाली. कालच वाजत गाजत लाडक्या गणपती बप्पांचं आगमन झालं. या मंगलमयी वातावरणानंतर दुसऱ्याच दिवशी अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यात गणेश भक्ताचाच मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय झालं?

मुंबईत मुलुंडचा राजा या गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावण्यासाठी गेले होते. त्यात दोघांनाही भरधाव बीएमडब्ल्यू कारने उडवलं. यात मुलुंडचा राजा मंडळातील एका कार्यकर्त्याचा या अपघातात मृत्यू झाला. प्रीतम असे या तरुणाचे नाव असल्याचं समजतंय. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी संशयित एकाला अटक करण्यात आली आहे.

मुलुंड पूर्वेला काल 7 सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या दरम्यान मुलुंडचा राजा मंडळाचे दोन कार्यकर्ते एका शिडीवर चढून बॅनर लावण्याचे काम करत होते. यादरम्यान एक बीएमडब्ल्यू गाडी रस्त्यावरुन जात असताना त्याच्या गाडीचा धक्का शिडीला लागला. त्यामुळे ते दोघेही शिडीवरुन खाली कोसळले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवगेळ्या टीम तयार केल्या. यानंतर सुरुवातीला पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. काही वेळातच गाडीचा शोध लागल्यावर आम्ही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे.

एकीकडे वरळी हिट अँड रन प्रकरणाच्या वरळीकरांसाठी जखमा ताज्या असतानाच दुसरीकडे मुंबईत Mumbai Hit and Run पुन्हा घडलेली हिट अँड रनची घटनेमुळे बेदरकार वाहनांचा प्रश्न समोर आलायं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+