मुंबईत पुन्हा हिट अँड रन प्रकरण, कारच्या धडेकत महिलेचा मृत्यू
मुंबई : राज्यात हिट अँड रन घटना प्रकरणाच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.पुणे, वरळी आणि नागपूरची हिट अँड रनच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आज पुन्हा एकदा मुंबईत असाच प्रकार घडला आहे. विरारमध्ये एका प्राध्यपिकेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. विरारमध्ये हा अपघात झाला असून आत्मजा राजेश कासट (वय 46) असे या प्राध्यापिकेच नाव आहे.
आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापिका आत्मजा कासट या गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन त्या जात असताना तेवढ्यात मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना गाडीने जोरदार धडक दिली.

या अपघातात आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. त्यांना कारचालकाने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील या कारचालकाला अटक केली आहे.
कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. शुभम पाटील (वय 25) असं कार चालक आरोपीचे नाव आहे. तो विरारच्या एका मोठ्या व्यावसायिकचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.












Click it and Unblock the Notifications