मुंबईच्या गोरेगावात पुन्हा हिट अँड रन, अल्पवयीन चालकाच्या कारने दुचाकीस्वारास चिरडलं, तरुणांचा मृत्य
Mumbai Hit and Run: पुणे आणि मुंबईतील हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईच्या गोरेगाव मधील आरे कॉलनीत हिट अँड रनची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन चालकाने SUV गाडीने 24 वर्षीय दुचाकीस्वारास धडक दिली आहे. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. नवीन वैष्णव असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दूध पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या तरुणाला हिट अँड रनमुळे आपला नाहक जीव गमवावा लागला आहे.
पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे. पहाटेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीस्वारावर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवर असणाऱ्या तरुणाला घटनास्थळीच गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचवून तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अल्पवयीन चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केलं आहे. यानंतर अल्पवयीन चालकासह दोघे जण आणि वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे नवीन वैष्णव दूध वाटपासाठी बाहेर पडला होता. आरे कॉलनीतून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने स्कॉर्पियो गाडी भरधाव वेगाने आली आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात नवीन वैष्णवचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नवीनला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि स्कॉर्पियो गाडीचा मालक इकबाल जीवानी आणि मोहम्मद फज इकबाल जीवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच अल्पवयीन आरोपीने मद्य प्राशन केलं होते की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अपघातापूर्वी आरोपीने मित्रांसोबत पार्टी केली होती का, याबाबत पोलीस आता तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications