नाही म्हणजे नाही : मुंबईत परदेशी महिला पर्यटकाचा विनयभंग; Video व्हायरल, नराधमांवर गुन्हा, काय घडलं?
foreign tourist harassment in Mumbai : 'अतिथी देवो भव' ही भारताची ओळख असली, तरी काही विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे या प्रतिमेला तडा जात आहे. मुंबईत एका परदेशी महिला पर्यटकाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पीडित महिलेने केवळ गप्प न बसता या घटनेचे चित्रीकरण केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहोचवून आरोपींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यास भाग पाडले.

नेमकी घटना काय?
इनेस फारिया नावाची परदेशी पर्यटक गेल्या दोन महिन्यांपासून भारत भ्रमंतीवर आहे. मुंबईत असताना दोन अनोळखी तरुणांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. इनेसने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन तरुण सुमारे १५ मिनिटे तिच्या मागे येत होते. तिने वारंवार नकार देऊनही ते जबरदस्तीने फोटो काढण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. ही परिस्थिती इतकी असह्य झाली की, अखेर तिला त्यांना स्वतःपासून दूर ढकलून द्यावे लागले.
सोशल मीडियावरून फोडला वाचा
इनेसने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तिने आपला अनुभव सांगताना लिहिले की, "मी भारतात दोन महिन्यांपासून आहे आणि आतापर्यंतचे माझे अनुभव अतिशय सुंदर आणि स्वागतार्ह राहिले आहेत. मात्र, आजचा दिवस वेगळा होता. ते तरुण सतत माझा पाठलाग करत होते, ज्यामुळे मला असुरक्षित आणि अस्वस्थ वाटले." तिने आपल्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला: "'नाही' (NO) हे एक पूर्ण वाक्य आहे. तुमची सुरक्षितता आणि तुमचा वावरण्यातील आराम यालाच प्रथम प्राधान्य असायला हवे."
मुंबई पोलिसांची तत्परता आणि कारवाई
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सनी इनेसला मोठा पाठिंबा दिला. अनेकांनी तिची माफी मागून तिला मदतीचे आश्वासन दिले. या घटनेची दखल मुंबई पोलिसांनी तातडीने घेतली. पोलिसांनी मेसेजद्वारे इनेसशी संपर्क साधला आणि तिचा पत्ता व संपर्क तपशील मिळवला.
या माहितीच्या आधारे मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये (पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ७८(१) ३(५) अंतर्गत) एफआयआर नोंदवला असून, व्हिडिओतील पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
इनेस फारियाने दाखवलेल्या धाडसामुळे या प्रकरणातील आरोपी आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. मात्र, अशा घटनांमुळे परदेशी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली, तरी रस्त्यावरील महिलांची सुरक्षा आणि छळवणुकीच्या घटना रोखण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी





Click it and Unblock the Notifications