मुंबईत चाललेय काय? व्यावसायिकावर गोळीबार; दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी धाड-धाड चालवल्या गोळ्या
मुंबईतील चेंबूर परिसरातील मैत्री पार्क येथे बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. दुचाकीस्वार आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत हल्लेखोरांनी खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या मारल्याचे सांगण्यात आले. त्यात दोन गोळ्या खान यांना लागल्या आहेत. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी सदरुद्दीन खान कारने आपल्या घरी परतत होते. जेव्हा त्याची गाडी डायमंड गार्डनजवळ सिग्नलवर पोहोचली तेव्हा तिथे आधीच वाट पाहणाऱ्या दोन गुन्हेगारांनी त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर त्यांची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. बुधवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. डीसीपी झोन ६ नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, सिग्नलवर एक गाडी थांबली तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी गाडीत बसलेल्या व्यक्तीवर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खान यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.
हल्लेखोर बाईकवरुन पसार
सायन - पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात होते. डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला आहे. गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असे पोलीसांनी सांगितले. गोळीबारानंतर एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे येथे एरव्ही देखील प्रचंड ट्रॅफीक असते. या घटनेने येथे घबराट पसरून आणखीन गोंधळ उडाला. संपूर्ण सायन ते पनवेल महार्गावरील ट्रॅफीक त्यामुळे जाम झाले. फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
#WATCH | Mumbai: DCP Zone 6 Navnath Dhawale says, "An incident of firing has been reported at Diamond Garden signal around 10 pm... When a car stopped at the signal, two bike riders fired on the person in the car. The injured person has been admitted to the hospital and is now… https://t.co/18nEF4ChkB pic.twitter.com/EKasAChIdU
— ANI (@ANI) April 9, 2025
फॉरेन्सिक टीमने केले पुरावे गोळा
पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे आणि तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील स्कॅन केले जात आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications