बंद सुटकेसमध्ये आढळले महिलेचे मुंडके; ऐन होळीच्या दिवशी घडलेल्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
पालघर जिल्ह्यातील विरार येथे आज होळीच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्गाहजवळ काही मुलांना खेळताना एक सुटकेस आढळली. मुलांनी ती सुटकेस उघडली असता त्यात एका महिलेचे मुंडके आडळून आले. स्थानिक मुलांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय झाले?
विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गाजवळ स्थानिक मुलांना एक सुटकेस सापडली. या मुलांनी उत्सुकतेपोटी ती सुटकेस उघडली. त्या सुटकेसमध्ये एका महिलेचे धडावेगळं केलेले मुंडकं आढळून आले. या घटनेमुळे मुलांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाहीये.
महिलेची क्रुर हत्या
या महिलेची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. तीचं मुंडकं पोलिसांना मिळालं आहे. आता इतर अवयव आरोपींनी कुठे टाकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्या कलिना येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, अधिक तपास सुरू आहे. मांडवी पोलीस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत.
इतर अवयवांचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येचा पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपींनी त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications