प्रायव्हेट व्हिडिओ बनवून शरीरसुखाची मागणी! तरुणीने प्रियकराच्या मदतीने टॅक्सी ड्रायव्हरचा केला खून!
Mumbai Crime News : नवी मुंबईत एका टॅक्सी ड्रायव्हरचा निर्घून खून झाल्याची घटना घडली. ही घटना चक्क एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केली अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या टॅक्सी ड्रायव्हरचा खून झाला तो खुन करणाऱ्या तरुणीला शरीर सुखासाठी त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपींना संगमनेरमध्ये अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबईतील उलवे येथे ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या सुरेंद्र नामक खासगी टॅक्सी चालकाचा खून झाला होता. या प्रकरणात एक तरुण आणि तरुणी संशयित आहेत असे पोलिसांना समजले त्यांनी या संशयितांचा शोध सुरु केला. खुनानंतर संशयित तरुणी आणि तिचा कथित प्रियकर मृत चालकाची टॅक्सी घेऊन पळाले होते.

संगमनेर येथे पोलिस ठाण्यात शरण...
संशयित तरुण आणि तरुणी यांनी खुनानंतर पोलिसांपासून वाचवण्यासाठी धावाधाव केली, मात्र पोलिसांपासून सुटका नाही हे समजल्यानंतर ते संगमनेर येथे ठाण्यात शरण आले. प्राप्त माहितीनुसार, रिया सरकल्याणसिंग असे तरुणीचे तर विशाल शिंदे असे या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत.
टॅक्सी चालकाचा कुजलेल्या अवस्थेत होता मृतदेह
टॅक्सी चालक सुरेंद्र याचा घरात खून झाला होता, त्याचा मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी येत असल्याने या घटनेची वाच्यता झाली. दरम्यान घटनास्थळी ज्यावेळी पोलिस गेले तेव्हा त्याचा मृतदेह कुजलेला दिसला होता.
रियाला सुरेंद्रने दिला होता घरात आश्रय
माहिती अशीही आहे की, सुरेंद्रने रियाला त्याच्या घर आश्रय दिला होता. यादरम्यान सुरेंद्रने तिचा आणि तिच्या प्रियकराचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. त्यानुसार, सुरेंद्र रियाला शरीरसुखासाठी ब्लॅकमेल करत होता, यासंदर्भात साम टीव्हीने वृत्त दिले आहे.
व्हिडिओवरुन करायचा ब्लॅकमेल
सुरेंद्रवर आरोप होता की, त्याने काढलेल्या व्हिडिओद्वारे तरुणीला ब्लॅकमेल करत होता. यामुळे रिया तिचा प्रियकर आणि सुरेंद्र यांच्यात वादही झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की, घरातील हातोडीने सुरेंद्रच्या डोक्यात प्रहार केल्यानंतर रिया आणि विशाल पसार झाले. या घटनेत सुरेंद्रचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.












Click it and Unblock the Notifications