मुंबईत पुन्हा एकदा CNG आणि PNG दरात वाढ, ऑटो, टॅक्सी वाहतूकीवर होणार मोठा परिणाम
Mumbai Cng And Png Price Hike : मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हात आता महागाईचा चटके बसत आहेत. कारण मुंबईत आत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागनगर गॅस लिमिटेडने आजपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे.
मुंबईत आता सीएनजी दरात 1.50 पैसेने वाढ केली आहे तर पीएनजीच्या दर 1 रुपये प्रति युनिट वाढवण्यात आले आहेत. आता नवीन दरानुसार मुंबईत सीएनजी 79.50 रुपये प्रति किलो रुपये मिळणार आहे तर पीएनजी 59 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता महागाईचा झळा बसणार आहेत.

घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. तथापि, कंपनीचे म्हणणे आहे की, सीएनजी अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे.
या वाहनांवर होणार परिणाम
सीएनजीच्या किंमती वाढल्याने दैनंदिन प्रवाशांसह टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांसारख्या सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांवरही परिणाम होणार आहे. मुंबईत जवळपास 3 लाखापेक्षा जास्त ऑटो आणि 20 हजार टॅक्सी दररोज धावत असतात. त्यासोबत इतर 5 लाख वाहने ही सीएनजीवर चालतात.
फ्रेबुवारी महिन्यातच ऑटो आणि टॅक्सी चालकांनी 3 रुपयांने भाडे वाढ केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सीएनजी भाव वाढल्यामुळे मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईत मुख्य इंधन म्हणून सीएनजीचा वापर केला जातो. येथे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. आता सीएनजीच्या किंमती वाढल्याने चालकांसोबतच प्रवाशांवरही आर्थिक ताण वाढणार आहे.












Click it and Unblock the Notifications