Video : अटल सेतूवर थरारक रेस्क्यू, कॅब चालक आणि पोलिसांमुळे वाचले महिलेचे प्राण
मुंबईतील अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल प्रचंड होत आहे. या व्हिडिओत एका महिलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शुक्रवारी (ता.16 ऑगस्ट) सायंकाळी 7 च्या दरम्यानची ही घटना आहे.
अटल सेतूवर ही एक महिला कॅबने अटल सेतूवर आली होती. संबंधित महिलेने गाडी चालकाला अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. कॅब चालकाने वेळीच पाहता तिच्या केसाला पकडून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत या पोलिसांनी तिला बाहेर काढून महिलेचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार रीमा पटेल असं या महिलेचं नाव आहे. ही महिला मुलुंड रहिवाशी आहे. मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते, असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे. दरम्यान याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर म्हणाले, "आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते."
कॅबचालकाच्या प्रसांगवधनामुळे वाचला महिलेचे प्राण
संबंधित महिला तिच्या अध्यात्मिक गुरुंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले होते. त्यामुळे ती अटल सेतूवर आली होती. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक एक फोटो समुद्रात टाकत असताना कॅब चालकाचे लक्ष गेलं. कॅब चालकाने वेळीच तिच्या केसाला पकडून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली, अशी माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ती अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता, याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
अटल सेतूवरून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला वाचवलं. pic.twitter.com/CZbfEPcwdI
— Viral Content (@ViralConte97098) August 16, 2024












Click it and Unblock the Notifications