Mumbai Andheri Fire :भयावह! मुंबईतील लोखंडवाला परिसरात मोठी आग, एका घरातील तिघांचा हृदयद्रावक मृत्यू

Mumbai Andheri Fire : मुंबईतील लोखंडवाला परिसरात मोठी आग लागली असून या भीषण घटनेत एकाच घरातील तिघांचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला ही आग लागली.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास रिया पॅलेस इमारतीच्या दहावा मजल्यावर एका घरामध्ये ही मोठी आग लागली. क्षणात या आगीने रौद्ररूप धरण केले. आग एवढी भीषण होती की, यातून पटकन खाली येता आले नाही. यामध्ये कुटुंबातील दोन ज्येष्ठ नागरिक आणि एका नोकरचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Mumbai Andheri Fire

दरम्यान घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आता ही आग विझवण्याचे जवळपास पुर्ण प्रयत्न झाले आहेत.

यांचा मृत्यू

चंद्रकांत सोनी (वय 76 वर्ष) कांता सोनी (वय 71 वर्ष) आणि नोकर रवी (वय 33 वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत. या घटनेत या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही आग कशामुळे लागली कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान पंचनामा करत आहेत. तसेच चौकशीही करत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+