मुंबईत पावसाचा जोर वाढला, पहाटेपासून पावसाला जोरदार सुरुवात
Mumbai Rain Update : मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. मुंबई परिसरात पाऊस जोरदार कोसळतोय. मुंबईत तासभर जरी पाऊस कोसळला तर लगेच त्याचा परिणाम दिसून येतो. आजही असेच चित्र बघायला मिळालं. तासाभराच्या पावसाने सुद्धा मुंबईत व्यवस्था कोलमडते. काही ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवा विस्कळीत होते. मुंबईत पडत असलेल्या पावसाने दररोज लाखोच्या संख्येने लोकल प्रवास करणा-या नोकरदार वर्गाचे हाल होतात. सकाळी कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होतात.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पहाटेपासूनच मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
#WATCH | Maharashtra: Heavy downpours in Mumbai cause waterlogging in parts of the city, visuals from Gandhi Market this morning. pic.twitter.com/vFdN2cATBz
— ANI (@ANI) July 18, 2024
महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
आज महाराष्ट्रसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. याठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications