Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई विमानतळावर कस्टम्सचा धडाका! 16 कोटींचे ड्रग्ज, हिरे अन् सोनं जप्त; 8 तस्करांना बेड्या

Mumbai Airport customs seizure : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या तस्करांच्या निशाण्यावर असले, तरी कस्टम विभागाने आपल्या सतर्कतेने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. ४ ते ११ फेब्रुवारी २०२६ या आठवडाभराच्या कालावधीत मुंबई कस्टम झोन-३ ने केलेल्या धडक कारवाईत तब्बल १८ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Airport Customs Seize

कारवाईचा तपशील: काय काय झाले जप्त?

कस्टम्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत अंमली पदार्थांपासून ते मौल्यवान हिऱ्यांपर्यंत मोठी तस्करी उघडकीस आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • मुद्देमाल : प्रमाण : अंदाजे किंमत
  • अंमली पदार्थ (हायड्रोपोनिक वीड) : १६.७५६ किलो : ₹१६.७५६ कोटी
  • परकीय चलन : विविध चलनांत ₹१.१३ कोटी
  • हिरे (नैसर्गिक व लॅब-ग्रोउन) : २४६.७५ कॅरेट ₹३८.२८ लाख
  • सोनं (२४ कॅरेट) : १०४ ग्रॅम ₹१५.२४ लाख

ड्रग्ज तस्करांचे मोठे जाळे उद्ध्वस्त

या कारवाईतील सर्वात मोठा हिस्सा हा अंमली पदार्थांचा आहे. सुमारे १६.७५ कोटी रुपयांचे 'हायड्रोपोनिक वीड' जप्त करण्यात आले आहे. हे अंमली पदार्थ कोठून आणले जात होते आणि मुंबईत कोणाला पुरवले जाणार होते, याचा सखोल तपास आता अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) केला जात आहे.

हिरे आणि सोन्याची लपवाछपवी

तस्करांनी केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर हिरे आणि सोन्याची तस्करी करण्यासाठीही नवनवीन क्लृप्त्या लढवल्या होत्या. २४६ कॅरेटचे नैसर्गिक आणि लॅब-ग्रोउन हिरे तसेच १५ लाखांचे सोने जप्त करून कस्टम्सने या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. याशिवाय, १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन बेकायदेशीरपणे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांनाही रोखण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी वर्दळ पाहता, सुरक्षा यंत्रणांनी आता अधिक कडक पावले उचलली आहेत. या कारवाईनंतर कस्टम्स विभागाने तस्करीविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. अटक करण्यात आलेल्या ८ प्रवाशांची कसून चौकशी सुरू असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+