फायद्याची गोष्ट! 800 यात्रेकरू रेल्वेने अयोध्येला रवाना! मोफत तीर्थयात्रेसाठी ही सरकारी योजना लयभारी
Mukhymantri mofat tirthkshetra yojana : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर येथून 800 जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर तसंच सर्वधर्मीय नागरिकांना होत आहे, असं पालकमंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले.

अयोध्येला जाण्याची संधी
गृह निर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले, तीर्थ दर्शन योजनेतून अयोध्येला जाण्यासाठी ही एक संधी आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर अनेक जेष्ठांची अयोध्येला जाण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून ही इच्छापूर्ती होते आहे.
फायद्याची गोष्ट!मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लय भारी!
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा धडाका लावला आहे. या सरकारची लाडकी बहिण, वयोश्री योजना चांगलीच लोकप्रिय झाली असून आता मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजनाही लोकप्रिय होत आहे. आपण आज याच योजनेचे फायदे, पात्रता आणि निकष जाणून घेणार आहोत.
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ
भारत देशात विविध पथांचे अनुयायी व वास्तव्यास आहे. तसेच महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जात असुन महाराष्ट्रात सर्वाधिक संत तसेच धर्मगुरु होऊ गेले आहे. महाराष्ट्राला वारकरी सप्रंदायाची, भक्तीमार्गाची परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिक यांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना ज्याचे वय 60 वर्ष किंवा त्याहुन अधिक आहे. अशा नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थस्थळांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्रीः तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आलीयं.
गावपातळीवर अर्ज भरण्याची सुविधा
ज्येष्ठ नागरिक हे लाभार्थी असलेल्या वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना या योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही गावपातळीवर करण्यात आली आहे. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे ही पूर्वअट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करुन त्यांना वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे
हे आहेत पात्रतेचे निकष
1.वयोमर्यादा 60 वर्षे व त्या वरील ज्येष्ठ नागरिक
2.महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
3.वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
हे लागतात आवश्यक कागदपत्रे
1. अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड (स्वंय सांक्षाकित प्रत)
2. महाराष्ट्रराज्याचे रहिवाशी असल्याबाबत अर्जदाराचे अधिवास प्रमाण पत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, अर्जदाराचे
15वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र (यापैकी कोणतेही एक)
3. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्ना योजना (AAY) किंवा प्राधान्य कुटुंब योजना (PHH) किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपयांच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेल्या (NPH) शिधापत्रिकाधारक (यापैकी कोणतेही एक)
4. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला शारिरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे अर्जदाराचे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications