आता मिळणार नाही लाडक्या बहिणींना पैसा, योजनेला लागला ब्रेक; महायुतीला बसेल का फटका?
राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षाकडून तयारी केली जात आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेला ब्रेक बसला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्वीकारणेही बंद केले आहे.
निवडणूक होईपर्यंत नाही मिळणार निधी
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार, महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांना मिळणार नाहीत. 'लोकसत्ता'ने याविषयीचे वृत्त दिले आहे.

2.40 कोटीहून महिलांना लाभ
उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने सदर योजनेंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये या प्रमाणे 5 महिन्यांचे हप्ते जारी केले आहेत. त्यातही सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदरच खात्यात जमा केलेत. आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या योजनेला दिला जाणारा निधी थांबवण्यात आल्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार हा निर्णय
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications