मकर संक्रांतीनिमित्त महावितरणचा इशारा, पतंग उडवताना ही काळजी घ्या
makar sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने पतंग उडवण्याशी संबंधित धोक्यांबद्दल नागरिकांना सतर्क केले आहे. पुणे झोनचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी विजेच्या तारा आणि अवतीभोवती पतंग उडवण्याच्या संभाव्य धोके बद्दल काही सुचना केल्या आहेत.
पवार म्हणाले की, पतंगाचे दोरे किंवा धागे विजेच्या तारांमध्ये अडकल्याने विजेचे झटके, गंभीर अपघात आणि वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरणने पतंग उडवण्या संदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत काही सुचना केल्या आहेत.

सुरक्षित पतंग उडवण्यावर भर
उद्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त महावितरणने नागरिकांना मोकळ्या आणि सुरक्षित ठिकाणी पतंग उडवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्य अभियंता पवार यांनी पालकांना मुलांना सुरक्षित पतंग उडवण्याच्या पद्धती शिकवण्याचे आणि त्यांचे पर्यवेक्षण करण्याचे आवाहन केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, 1912, 18002123435, आणि 18002333435 या टोल-फ्री क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
धोकादायक मांझा
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूच्या लेपित आणि नायलॉन मांझाच्या धोक्यांवर भर देत, महावितरणने इशारा दिला आहे की, जर ते तारांच्या संपर्कात आले तर गंभीर दुखापत, मृत्यू आणि वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. राज्य सरकारने या धोकादायक मांझ्यांच्या वापरावर बंदी देखील घातली आहे. या बंदीमुळे चिनी मांझा, काचेचे लेपित धागा आणि कृत्रिम धाग्याचा वापर बंद झाला आहे. हे साहित्य पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पर्यावरणपूरक पर्याय
आपल्या जवळच्या मार्केटमध्ये पुर्यावरण पुरक साहित्य उपलब्ध आहे. तसेच विक्रेत्यांनी पर्यावरणपूरक पर्याय दिले आहेत. पेठमधील स्टॉलचे मालक इलियास शेख म्हणाले की, आता आम्ही कापसाचे धागे विकत आहेत. जे पर्यावरण आणि मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. पूर्वी पतंग उडवण्यासाठी पारंपारिक कापसाचे धागे हे प्राथमिक साहित्य होते. आता पुन्हा लोकप्रिय होत आहे.
उत्सव सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा
मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि नागरिक पतंग उडवण्याची परंपरा सुरक्षितपणे साजरी करण्यासाठी तयारी करत आहेत. धोकादायक साहित्यावर बंदी घालून विद्युत खांब किंवा ट्रांसफार्मरभोवती सुरक्षित अंतर ठेवून आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून हा उत्सव सर्वांसाठी आनंददायी आणि सुरक्षित बनवण्यासाठी काम केले जात आहे.












Click it and Unblock the Notifications