Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MSEDCL : पावसाळ्यापूर्वीच एमएसईबीने उचललं मोठं पाऊल; या शहरात सुरू केलं काम, लोकांना होणार फायदा!

MSEDCL and Mahatransco Latest News : महाराष्ट्रात लवकरच मान्सून लवकर येण्याची अपेक्षा आहे. अशातच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) यांनी पुणे विभागातील सबस्टेशन आणि ट्रान्समिशन लाईन्सवर मान्सूनपूर्व देखभालीचे कामांना गती दिली आहे. येत्या पावसाळ्यात नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

MSEDCL and Mahatransco

पुणे शहरसह जिल्ह्यातील या भागात दुरुस्तीचे काम सुरू

महावितरण आणि महापारेषण पथकांनी नांदेड शहर, धायरी, नर्हे, रायकर माळा, वडगाव, देशपांडे गार्डन सोसायटी, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, फडतरे चौक, पेशवे पार्क, कर्वे नगर, थोरात कॉलनी, आनंद निकेतन, मधुबन कॉलनी, नवसह्याद्री सोसायटी, वसंत नगर, इंदिरा पार्क, आनंद नगर, गुजरात कॉलनी, एमआयटी कॉलेज रोड आणि खराडी, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी-चिंचवड, तळवडे एमआयडीसी, देहू, मोशी आणि चिखली या भागात नियोजित देखभालीचे काम केले. या भागातील नियोजित वीजपुरवठा खंडित होण्याबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आलेली होती. काही काळ लोकांना वीजपुरवठा खंडीत झाल्याने त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु, आगामी काळात पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

या कामांवर केला जात आहे फोकस!

देखभालीच्या कामाच्या व्याप्तीमध्ये वीज तारांच्या संपर्कात असलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे; तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे; वितरण ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर आणि रिंग मेन युनिट्स (आरएमयू) चे अर्थिंग तपासणे; ट्रान्सफॉर्मरसाठी तेल गाळणे आणि टॉपिंग करणे; ट्रान्सफॉर्मर वितरण बॉक्स दुरुस्त करणे; सदोष वीज अरेस्टर बदलणे; विद्युत खांब आणि सॅगिंग वायर्स मजबूत करणे; गंजलेले किंवा खराब झालेले खांब आणि जुने वायर्स बदलणे; फीडर पिलर साफ करणे; आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे लावणे; आणि उच्च आणि कमी-दाब असलेल्या लाईन्सचे रक्षण करणे यांचा समावेश आहे. ब्रेकर दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मर देखभाल आणि ऑइल टॉप-अप सारखी सबस्टेशन-स्तरीय कामे देखील केली जात आहेत.

नागरिकांनाही केले हे आवााहन!

दुसरीकडे, महावितरणने खाजगी मालमत्ता मालकांना आणि संस्थांना त्यांच्या परिसरात असलेल्या मोठ्या झाडांच्या फांद्या सक्रियपणे छाटण्याचे आवाहन केले आहे. जे मुसळधार पाऊस किंवा वादळात ओव्हरहेड पॉवर लाईन्सवर पडू शकतात. "अशी छाटणी महानगरपालिकेकडून पूर्वपरवानगी घेतल्यानंतर किंवा त्यांच्या मदतीनेच केली पाहिजे. गरज पडल्यास आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही महावितरणकडून सांगण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील विविध विभागात देखील कामांना वेग

दुसरी बाब म्हणजे, राज्यभरात देखील अशा प्रकारची कामे केली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील अधिकाऱ्यांकडून देखील त्यांच्या विभागात मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या भागात दुरुस्तीचे काम केले जात आहेत, त्या भागातील विजपुरवठा काही काम खंडीत केला जाणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+