काकांचा पक्ष आणि चिन्ह पळवणा-यांना मर्दानगीची भाषा शोभत नाही; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठच महिन्यात कोसळल्यानंतर महाविकासआघाडीचे नेते आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधा-यांच्या नेत्यांच्या फोटोंना जोडो मारो आंदोलन केलेय यावर काल बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनसन्मान यात्रेदरम्यान " फोटोंना जोडे काय मारताय हिंमत असेल तर समोर या. रडीचा डाव कसला खेळताय", असे आव्हान दिले. यावर आता शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
मुंबईत संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे आपल्या काकांचे पक्ष आणि चिन्ह आपले कर्तृत्व नसताना मोदी आणि शहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात त्यांनी अशी भाषा वापरु नये. त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्व:ताचा पक्ष स्थापन करावा, निवडणूक लढवावी, शिंदे किंवा अजितदादांसारखे लोक जे चो-यामा-या करुन राजकारणात आहेत त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही असा टोलाही अजित पवारांना राउत यांनी लगावला.

अजित पवार काय म्हणाले होते?
सोमवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मानेचे आयोजन करण्यात आले, यावेळी अजित पवारांनी महाविकासआघाडीच्या आंदोलनावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका. आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो. हा कसला रडीचा डाव खेळताय", अशा भाषेत अजित पवारांनी विरोधकांना आव्हान दिले होते.
मोदींना नितेश राणेंची भाषा मंजूर आहे? राऊतांचा सवाल
आमदार नितेश राणे यांनी नगरमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याचाही समाचारही राऊत यांनी घेतला त्यांनी नगरमध्ये भाषणा दिले जे भाजपचे आमदार आहेत ज्यांचे वडिल आधी शिवसेनेत होते नंतर ते काॅग्रेंसमध्ये गेले नंतर आता ते भाजपमध्ये आहेत. आता ते हिंदुत्वादी बनले आहेत. तो आमदार म्हणतो की मशिदीत घुसून मारू, नरेंद्र मोदींना माझे आवाहन आहे की, तु्म्हाला अशा प्रकारची भाषा मंजूर आहे का? जर तुम्हाला मंजूर असेल तर तुम्ही परदेशात इस्लामिक देशात मशिदीत जाऊन तेथील मोठमोठ्या नेत्यांच्या गळ्यात पडता, धर्मनिरपेक्षता शिकवता ते ढोंग बंद करा. मशिदीत घूसन मारण्याची धमकी कोण देत असेल तर सरकारने काय कारवाई केली? मशिदीत घुसण्याआधी पाकिस्तान घुसा आणि दहशतवादाविरोध लढाई सुरु करा. आजच जम्मूत आपल्या आर्मीबेसवर हल्ला झाला आहे. बीजेपीचे आमदारासारखे लोक गावागावांत दंगली भडकवण्याचे काम करताहेत. राज्यात आग लावत आहेत, त्यांच्या गावातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. आणि हे दंगलीची भाषा करत आहेत.
छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सगळे भाजपमध्येच
राज्यपाल कोश्यारी, प्रफूल्ल पटेल अशा अनेक लोकांना महाराजांचा अपमान केला. हे सगळे भाजपचे प्रोडक्ट आहेत. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये आहे. मालवण पुतळ्यासंदर्भात अद्यापही अटक झालेली नाही. ठेकेदार, शिल्पकार फरार नाहीत तर मग वर्षा बंगल्यावर लपून बसेल नाहीत ना? असा सवालही राऊत यांनी केला. त्या फरार शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत आहेत त्यांनी तर त्याला लपविलेले नाही? अशी लोकांच्या मनात शंका असल्याचेही संजय राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications