"शेतकऱ्यांना मदत न दिल्यास PM मोदी, CM फडणवीसांना उडवून देऊ!" या खासदाराचे विधान, भाजपने दिले उत्तर
Congress MP Prashant Padole : अतिवृष्टीमुळे धान पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि राज्य व केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मदत न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. लोकप्रतिनिधीची मर्यादा ओलांडून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली आहे. त्यांचे हे वक्तव्य आता मोठे राजकीय वादळ निर्माण करत आहे.

प्रशांत पडोळे नेमके काय म्हणाले?
खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मागणी करताना, सरकारला थेट धमकी दिली आहे. "केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबतचे धोरण त्वरित बदलावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत करावी. जर मदत दिली नाही, तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उडवून देऊ अशी धमकीच या खासदाराने दिली आहे."
🟧 04 - 11 - 2025 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 4, 2025
प्रशांत पडोळे यांचे वक्तव्य बालिश पणाचे आहे.@CMOMaharashtra #Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule pic.twitter.com/PuHoWhtHXK
पडोळे यांची मागणी काय?
प्रति हेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत मिळावी ही आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना परतीच्या पावसाने मोठा फटका दिला असून, धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ किरकोळ रुपये मिळतात, ही मोठी शोकांतिका आहे असे ते म्हणाले.
वक्तव्यामुळे वादळ
प्रशांत पडोळे यांचे हे अजब वक्तव्य समोर येताच, ते त्वरित वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणे संसदीय मर्यादांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी मागणी करताना अशा प्रकारे धमकी देणे कितपत योग्य आहे, यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर टीका होत आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचे पडोळेंना प्रत्युत्तर
प्रशांत पडोळे यांचे वक्तव्य खरेतर बालिशपणाचे आहे. शेतकऱ्यांना आमचे सरकार मदत करत आहेत.
शेतकरी, पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईकरता ३२ हजार कोटी रुपये आमच्या सरकारने राखीव निधी ठेवला आहे. साडे नऊ हजार कोटी रुपये वितरीत झाले आहेत. प्रशांत पडोळे हे अपघाताने खासदार झाले आहेत. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. त्यांनी आपल्या नेत्याला विचारायला हवे की, देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा अपघाताने खासदार असल्याने आणि त्यांच्यात प्रगल्भता नसल्याने ते असे बोलले, हे बालीशपणाचे लक्षण आहे.
खासदार प्रशांत पडोळे: थोडक्यात ओळख
डॉ. प्रशांत पडोळे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून, ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून आले आहेत. शेतकरी आणि स्थानिक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात.
भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात खासदार प्रशांत पडोळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.












Click it and Unblock the Notifications