अजित पवारांना अडकविण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन; 'या' मोठ्या नेत्याने केला आरोप

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. मस्सोजोगचे हे प्रकरण घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यात असलेली गाडी ही वाल्मिक कराड होती व वाल्मिक कराडच अजित पवारांना अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा, खा. बजरंग सोनवणे यांनी केला आहे. खा. सोनवणे यांच्या या दाव्यामुळे पुन्हा चर्चा वाढल्या आहेत.

Ajit Pawar

काय म्हणाले खा. सोनवणे?

प्रसारमाध्यमांशी बोलताना बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत नवी माहिती दिली. यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी होती, असा दावा केला होता. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझा अजित पवारांवर आरोप नाही. मात्र अजित पवार जेव्हा २१ तारखेला आले होते, तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती तिच गाडी मास्टरमाईंड वाल्मिक कराड सरेंडर होण्यासाठी जेव्हा आला, तेव्हा होती. माझ्याकडे हे सगळे फोटो आहेत. मी विनाकारण आरोप करत नाही. माझा अजित पवारांवर कोणताच आरोप नाही, असंही खा. सोनवणे यांनी स्पष्ट केलं.

सोनवणे यांचे नेमके म्हणणे काय?

पुढे बोलताना खा. सोनवणे म्हणाले, संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले पाहिजेत. त्यांना फाशी झाली पाहिजे. यामागच्या मास्टरमाईंडला फाशी झाली पाहिजे, हाच माझा फोकस आहे. अजूनही या प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत. त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे. अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाहीये. अजित पवारांना काही बोलण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाहीये, त्यांच्याविषयी बोलण्याचं मला काहीच कारण नाही. मात्र वाल्मिक कराड त्यांना अडकवतोय का, हे पहावं लागेल. ताफ्यात गाडी टाकून अजितदादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा आरोप सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+