खा. अमोल कोल्हे यांच्यावर शरद पवारांनी दिली 'ही' मोठी जबाबदारी
मुंबई : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. तर महायुतीला या निवडणूकीत मोठा फटका बसला.लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार गटाने त्यांच्याकडे लोकसभेतील मुख्य प्रतोद पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत स्वतःहून खा. अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2024
ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव… pic.twitter.com/cEnOj0ngEa
अमोल कोल्हे यांनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये असं म्हटलंय की, "एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !" असंही अमोल कोल्हे म्हणाले












Click it and Unblock the Notifications