वाल्मिक कराड-विष्णू चाटे दिंडोरी आश्रमात राहिले? तृप्ती देसाईंच्या आरोपाला दिंडोरी मठाकडून उत्तर

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज रोज नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही या प्रकरणात उडी घेऊन वाल्मिक कराड व विष्णू चाटे हे दोघेही दिंडोरी येथील आश्रमात आश्रयाला होते, असा आरोप केला आहे. त्यावर आता दिंडोरी पीठाकडून गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी उत्तर दिले आहे.

Tripti Desai

काय आहे देसाईंचा आरोप?

तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांना दिंडोरी पीठाकडून वाचवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. हे दोघेही दिंडोरीला आश्रयाला गेले होते, असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केला. याशिवाय दिंडोरी पिठाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्यावर त्यांनी लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले आबासाहेब मोरे?

तृप्ती देसाई यांच्या आरोपानंतर अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी या सर्व आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले, तृप्ती देसाई या फक्त प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहेत. वाल्मिक कराड संदर्भात पोलिस येथे चौकशी करुन गेले. दत्तजयंती सोहळ्याला वाल्मिक कराड व विष्णू चाटे येथे दर्शनासाठी आले होते. मात्र ते फक्त एक भाविक म्हणून आले होते. त्यांना ना कुठली व्हिआयपी ट्रिटमेंट दिली गेली ना त्यांनी येथे मुक्काम केला. यासंदर्भातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना दिले आहेत. सीआयडी टिमलाही आम्ही ही माहिती दिली आहे, असा दावा आबासाहेब मोरे यांनी केला.

गुरुमाऊलींवर आरोप

तृप्ती देसाई यांनी दिंडोरी पिठाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला. त्या आरोपावरही आबासाहेब मोरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, केवळ प्रसिद्धीसाठी त्या हे सर्व बोलताहेत. हे मंदिर आहे. इथ आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो. मागे काही वर्षांपूर्वी एका सेवेकरी व्यक्तीबाबत असे आरोप झाले होते. मात्र तक्रारदार हायकोर्टात खोटे ठरले. तक्रारदारांनी माफीही मागितली. त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्थ नसल्याचं आबासाहेब मोरे यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+