Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मान्सूनचा पाऊस कधी बरसणार आली ही नवी अपडेट, शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई करु नका; कृषी विभागाचा सल्ला

Monsoon New Updates : राज्यात मान्सूनने लवकर आगमन करुन दडी मारली. त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही. आता यादरम्यानच मान्सूनबाबत मोठी अपडेट आली आहे. राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. हा संदर्भ लक्षा घेता राज्याच्या कृषि विभागाने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन केले आहे.

Monsoon New Updates

photo- AI

हवामानाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

Take a Poll

शेतकऱ्यांसाठी महत्वाची सुचना काय?

कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी 'राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. असे सांगितले.

पंधरा जून नंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी, बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के, चार जिल्ह्यांत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

मोसमी पाऊस तीन चार दिवसांत सक्रिय

मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.

कुठे कधी पाऊस पडणार?

मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा - मराठवाड्यातील काही भागात बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बारा, तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण - कोकण, गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर १३ ,१४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वीज, समुद्री लाटांपासून करा संरक्षण

या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, वीजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज पुरवठा खंडित करुन ठेवावीत, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+