Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Money laundering case: नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर

महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणांसाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 30 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलाच्या निवेदनाची दखल घेतली, की ते विविध आजारांनी ग्रस्त आहेत.

Money laundering case  SC grants bail to NCP leader Nawab Malik on medical grounds


मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रलंबित नियमित जामीन याचिका निकाली काढेपर्यंत श्री मलिक यांना वैद्यकीय जामीन वैध असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकृती ठीक नसल्यामुळे मलिक यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता तेव्हापासून नवाब मलिक बाहेर आहेत.

नवाब मलिक हे काही दिवसांपासून मेडिकल जामीनावर बाहेर आहेत. मलिक यांनी जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. याआधी त्यांना आठवडा किंवा दोन आठवडा अशी मुदत मिळत होती. त्यामुळे त्यांना वारंवार अंतरिम जामीनासाठी अर्ज करावा लागत होता.

नबाल मलिक यांच्या जामीनावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत नवाब मलिक हे आजारी आहेत, तोपर्यंत ते बाहेर राहू शकतील. त्यांना तोपर्यंत तुरुंगात टाकता येणार नाही. याशिवाय, ते आजारी असेपर्यंत जामीनावर राहू शकतात, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय सक्तवसुली संचालनालयाने देखील याला कसलाही विरोध केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंडमधील मनी लँडरिंगप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक दीड वर्ष तुरुंगात होते. नवाब मलिक हे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना काही अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला होता. ११ ऑगस्ट रोजी नवाब मलिक यांना जामीन मिळाला होता. तेव्हापासून ते अंतरिम जामीनावर बाहेर आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+