Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांचे कठोर पाऊल, सर्व आरोपींना लावला मोक्का

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, माजीमंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील सर्व 26 आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही वाँन्टेड आहेत.

Baba Siddiqui

गोळ्या घालून झाली होती हत्या

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यांचा मुलगा व आमदार झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात बाबा सिद्धीकी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांना घटनेनंतर तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेनंतर तत्काळ नाकाबंदी करत पावले ऊचलली होती. ही हत्या कुख्यात अंडरवर्ड डाँन लाँरेन्स बिश्नोई गँगने केली होती.

आत्तापर्यंत 26 जणांना अटक

सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे. त्यातील संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे. शुभम लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर हे आरोपी वाँटेड आहेत. सिद्दिकींची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अजूनही वाँन्टेड आहेत. आता पोलिसांनी या 26 आरोपींना मोक्का लावला आहे.

सिद्धीकी यांचे बाँलिवूडसोबत होते संबंध

काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. सलमान खान याच्यासोबतही त्यांची मैत्री होती. याच रागातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते. सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राजकीय क्षेत्राबरोबरच बाँलिवूडही हादरले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+