बाब्वोव..! मोदींच्या 8, योगींच्या 15, शहांच्या 20 सभांचं नियोजन; पहा, अजून कुणाच्या तोफा धडाडणार
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी व महायुतीत मुख्य दुरंगी लढत होणार असली तरी वंचित, मनसे आणि तिसऱ्या आघाडीनेही रणनिती आखली आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने विधानसभेला नवीन रणनिती तयार केली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी या दिग्गजांच्या विक्रमी सभांचे आयोजन केले आहे. येत्या काही दिवसांत या सभांचा धुरळा उडणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभांचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात तब्ब्ल आठ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या आठ सभा विभागून घेण्यात येणार आहेत. याच्याशिवाय या सहाही विभागांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही विक्रमी सभा होणार आहेत.

महाराष्ट्रात कुणाच्या किती सभा
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ सभा, योगी आदित्यनाथ यांच्या १५ सभा, अमित शहा यांच्या २० सभा, नितीन गडकरी यांच्या ४० सभा, देवेंद्र फडणवीस यांच्या ५० सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगी आदित्यनाथ व अमित शहा महाराष्ट्रात विक्रमी सभा घेणार असून योगींच्या सभांनंतर महाराष्ट्रातील वातावरण महायुतीसाठी पाँझिटिव्ह होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मविआ व महायुतीत खरी लढत
यंदा २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यात तुल्यबल लढत होणार आहे. महायुतीने ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गटाला कोंडीत पकरण्याचे सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांच्या सभाही याच नियोजनाचा एक भाग आहे. ठाकरे व शरद पवारांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न या दिग्गजांकडून होणार आहेत.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications