मनसेची तिसरी यादी जाहीर; राज ठाकरेंनी धनंजय मुंडेविरोधात शिलेदार उतरवला, वाचा कोणाला कुठे संधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.23) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत मनसेने 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे सरचिटणीस यांनी ही यादी जाहीर केली.
या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून मनसेचे अभिजित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

मनसेच्या तिसऱ्या यादीत कोणाला स्थान व कोणता मतदारसंघ?
1. पप्पू उर्फ मंगेश पाटील - अमरावती
2. दिनकर धर्माजी पाटील-नाशिक पश्चिम
3. डॉ.नरसिंग भिकाणे - अहमदपूर-चाकूर
4.अभिजित देशमुख - परळी
5.सचिन रामू शिंगडा - विक्रमगड
6.वनिता शशिंकात कथुरे- भिवंडी ग्रामीण
7.नरेश कोरडा-पालघर
8.आत्माराम प्रधान- शहादा
9.स्नेहल सुधीर जाधव- वडाळा
10. प्रदीप वाघमारे - कुर्ला
11.संदीप पाचंगे-ओवळा माजिवाडा
12.सुरेश चौधरी -गोंदिया
13.अश्विन जयस्वाल -पुसद
आतापर्यंत 65 उमेदवारांचे नावं घोषित
राज ठाकरे यांनी यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणं मनसेनं एकला चलोची भूमिका कायम ठेवली आहे. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल मनसेकडन 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली . आज मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. म्हणजेच मनसेकडून आतापर्यंत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंकडून अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे दिनकर पाटील मनसेत, लगेच उमेदवारी
भाजपनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारी देण्याच्या निर्णयाला दिनकर पाटील यांचा विरोधा होता. पाटील यांनी काल त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. आज दिनकर पाटील यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीमध्ये दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications