Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"..जाऊ दे मरु दे तिला!" 'ती जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत संदीप देशपांडेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

Jitendra Awad Vs MNS Maharashtra Assembly Election 2024 : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाड यांची कथित जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत त्यांनी काही प्रश्न विचारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रपवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसे नेते यांच्यात काही ना काही वाद उद्भवतात आणि ठिणग्या पडतात. त्यांच्यात नेहमी राजकीय टीका-टीप्पणी सुरुच राहते. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांसंबंधीत त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक ट्वीट केले आहे.

MNS leader Sandeep Deshpande revealed the controversial audio clip of Jitendra Awhad

काय आहे ट्वीट?

राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप त्यांनी ट्विट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निषेध मोर्चातील शपथेवरून त्यांनी टोला देखील लगावला आहे. शपथ घेतली होती ना..असे म्हणत त्यांनी हे ट्वीट केले आहे.

ट्वीटद्वारे 'ही' केली टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची कथित ऑडिओ क्लिप पोस्ट केली असून यात आव्हाड यांचा फोटोही दिसत आहे. या क्लिपखाली महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ह्या राजकारण्यांचे महिलांबद्दलचे मत बघा...असा मजकूर आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

यापार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला, यामध्ये ते म्हणाले, "ही ऑडिओ क्लिप जुनी आहे. पण यातून कोणाची काय मानसिकता आहे ते दिसून येते. एखाद असे प्रकरण झाले असेल तर क्लिपमधील कोण व्यक्ती आहे, याचे खरेच जितेंद्र आव्हाडांसोबत बोलणे झालेले आहे का? आणि झाले असेल तर हे नेमकं प्रकरण काय आहे?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

ती व्यक्ती कोण..? - संदीप देशपांडे

संदीप देशपांडे म्हणाले, "आपण पाहिली त्यात जी नाव घेतलेली आहेत ती अतिशय गंभीर नावं आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. ती व्यक्ती कोण आहे? त्याला शोधून काढायला हवे. त्याच्यासोबत बोलले पाहिजे, कोणते प्रकरण होते, त्याविषयी पूर्ण चौकशी केली पाहिजे, असं संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे."

चौकशी व्हायला हवी.. - संदीप देशपांडे

संदीप देशपांडे म्हणाले, ही ऑडीओ क्लिप जुनी आहे पण यातून कुणाची काय मानसिकता दिसते हे दिसून येते. या प्रकरणात जी नावं घेतली गेली ती हायप्रोफाईल नावे आहेत. ही ऑडीओ क्लिप जी मी शेअर केली ती ऑलरेडी समाजमाध्यमांवरुन आलेली आहे. याच जी नावे घेतली गेली ती गंभीर आहेत. माझ्याकडे ऑडीओ क्लिप आहे त्याची चौकशी पोलिसांनी करुन जनतेसमोर सत्य यायला हवे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+