मनसेच्या कार्यकर्त्यांचा हाँटस्टारमध्ये'राडा'; केली 'ही' मोठी मागणी
ओटीटी अँपवरही मराठी भाषा असावी, यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज हाँटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात पोहोचले. तेथे मनसे नेते अमेय खोपकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत मराठी समालोचनासाठी आग्रही भूमिका मांडली. तेथूनच मंत्री उदय सामंत यांना फोन करण्यात आला. पोलिसही यावेळी उपस्थित होते.

नेमके काय झाले?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यापूर्वीही मनसे मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका मांडताना दिसली आहे. ओटीटी अँपवरही मराठी भाषा असावी, अशी मनसेची मागणी आहे. त्याच मागणीवरुन आज मनसेचे कार्यकर्ते अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक हे नेते हॉटस्टारच्या कार्यालयात पोहोचलेत. तेथे त्यांनी हाँटस्टारच्या अधिकाऱ्यांकडे मराठी समालोचनासाठी आग्रह धरला.
सामंतांना कार्यालयातून फोन
मनसे पदाधिकारी अमेय खोपकर यांनी हाँटस्टारच्या कार्यालयातूनच मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. या संभाषणात मंत्री सामंत यांनीही मनसेच्या मागणीला पाठींबा दर्शवला. फोनवर मंत्री सामंत म्हणाले, "मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये? हे कोण ठरवणारे? बाकीच्या भाषांची काँमेंट्री असावी आणि मराठीची नसावी, हे योग्य नाही. बाकीच्या भाषांचा आदर आहेच. पण मराठीत कॉमेंट्री असावी हे शंभर टक्के बरोबर आहे" असं उदय सामंत यांनी फोनवरच सांगितलं. त्यावर 'साहेब मी इथून पत्र घेऊन निघतो. काही असेल तर फोन करतो' असं अमेय खोपकर म्हणाले.
अधिकाऱ्यांनी मागितला वेळ
मंत्री सामंत यांच्या आदेशानंतर हाँटस्टारच्या अधिकाऱ्यांनी मागणी मान्य करत, यासाठी वेळ मागितला. स्टुडिओ करायला वेळ लागेल, असं त्यांच म्हणणं होतं. मात्र खोपकर यांनी काँमेंट्री स्टेडिअमवर होत नाही. ऑफीसमध्ये होते. स्टुडिओही ऑफीसमध्येच असतो. तो उभारायला दोन दिवस लागतील, असं सांगितलं. त्यावर अधिकाऱ्याने थोडा वेळ मागितला. खोपकर यांनी या अधिकाऱ्याला लेखी देण्याची मागणी केली.












Click it and Unblock the Notifications