ना वाद, ना वैमनस्य, ना खंडणीसाठी फोन..! मामाची हत्या झाल्यानंतर आ. टिळेकर पहिल्यांदा बोलले, म्हणाले.
भाजपचे पुण्याचे आ. योगेश टिळेकर यांच्या मामाचे सोमवारी पहाटे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. सायंकाळी शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. आमदाराच्या मामाचे भर चौकातून अपहरण व त्यानंतर खून करण्यात आल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. विशेष म्हणजे मृतदेहावर मारहारणीच्या खूणा स्पष्ट दिसत होत्या. आता या प्रकारानंतर आ. योगेश टिळेकर यांची प्रतिक्रीया समोर आली आहे.

सोमवारी झाले होते अपहरण
आ. योगेश टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे सोमवारी पहाटे अपहरण करण्यात आले होते. एका चार चाकीत गाडी आलेल्या चौघांनी त्यांना बळजबरी गाडीत बसविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. सायंकाळी शिंदवणे घाटात अपहरण केलेल्या ठिकाणावरुन सुमारे ४० किलोमिटरवर सतिष वाघ यांचा मृतदेह आढळला.
मृतदेहावर मारहाणीच्या खुणा
हा मृतदेह सापडल्यावर एकच खळबळ उडाली. लोकप्रतिनिधीचे कुटुंब सुरक्षित नसेल तर समान्यांचे काय..? हा प्रश्न विचारला जावू लागला. अपहरण झाल्यानंतर वाघ कुटुंबियांना कुणीही फोन केला नाही किंवा खंडणीसाठी काही काँल आला नाही. मृत सतिष वाघ यांचे कुणाशी वैमनस्यही नसल्याचे सांगितले गेले. मग हा खून कशासाठी केला, हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. वाघ यांची कुणासोबतच दुश्मनी नव्हती अशी माहितीही समोर आल्याने, पोलिसांचा गोंधळ वाढला आहे.
वैयक्तिक वैमनस्याचा धागा जुळेना
मृत सतीष वाघ यांना शेतीची आवड होती. शेवाळेवाडीजवळ त्यांचं एक हॉटेलही होतं, अशी माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण आणि हत्येनंतर याप्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून ज्या चौकातून त्यांना गाडीत बसवून अपहरण झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. अपहरणकर्त्यांची गाडी ज्या मार्गावरून गेली तो सर्व मार्ग खंगाळण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे पोलीस सध्या हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खून काही वैयक्तिक वैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. जमिनीचा वाद, वैयक्तिक संबंध किंवा अन्य कारणेही लक्षात ठेवून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. पोलिसांची 8 पथक राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
आ. टिळेक यांची पहिली प्रतिक्रिया
या प्रकारानंतर आ. टिळेकर हे पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले. ते म्हणाले, "काल या जागेवरून सकाळी अपहरण झालं आणि खून झाला. पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करतेय. लवकर पोलीस याचा सुगवा लावतील. आमच्यासाठी मोठा धक्का आहे. मात्र पोलीस आरोपीना शोधून काढतील. काही तासामध्ये सुगवा लागेल. आमदाराचा मामा असेल तरी याच राजकारण करू नये. पोलिसांवर आमची कोणतीही शंका नाही. सरकार चांगलं काम करतेय. सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे, असंही टिळेकर यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications