Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्राजक्ता माळी, सपना चौधरीपासून रश्मिका मंधनापर्यंत... सुरेश धसांनी आता सगळंच काढलं

प्राजक्ता माळी, सपना चौधरीपासून थेट रश्मिका मंधानापर्यंतच्या अभिनेत्रींची नावे घेत आ. सुरेश धसांनी आज पुन्हा खळबळ उडवून दिली. त्यांनी आज बीडचे नवीन पोलिस अधिक्षक नवनीत काँवरा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. या संवादात त्यांनी पुन्हा आकाविरोधात आरोपांची राळ उडवून दिली.

Suresh Dhas

प्राजक्ता माळीचे घेतले नाव

सुरेश धस म्हणाले, आमच्या परलीत रश्मिका मंधाना, सपना चौधरी कायम येत असतात. प्राजक्ता माळीचा पत्ता, तर आता परळी पॅटर्नच आहे. तिला शोधायचे असेल, तर परळीला यावं लागेल, असं म्हणत त्यांनी आकाच्या परळी पॅटर्नचा भांडाफोड केला. सुरेश धसांनी आज प्राजक्ता माळीचं नाव दोनदा घेतलं. ज्यांना इव्हेंज मॅनेजमेंट पाँलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं, त्यांनी परळीत यावं, असं म्हणत धसांनी अनेक आरोप केले. या आकाच आणि या अभिनेत्रींचे संबंध काय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

'आकां'वर गंभीर आरोप

सुरेश धस म्हणाले, बीड जिल्ह्यात 'आकां'ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? असा प्रश्न विचारत धस म्हणाले, बीडमधील 'आका'च्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील 1400 एक गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे. शिरसाळा गावात गायरान जमिनींवर 600 वीटभट्ट्या आहेत. यापैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला. आकाचे कार्यकर्ते येथून काही अंतरावर असलेल्या 50 ते 60 एकर जमिनीवरील मुरुम काढून आणतात आणि दुसऱ्या जमिनीवर टाकतात. परळीतील ही गँग्ज ऑफ वासेपुर खतरनाक काम करते.

बीडचे मलेशिया कनेक्शन

सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव बेटिंग अॅप प्रकरणात गुंतलेल्या बीडमधील एका व्यक्तीचा उल्लेख केला. या प्रकरणात दोन अधिकारी होते. या व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. 100 कोटी रुपयांच्या पुढे आर्थिक गैरव्यवहार असल्यास ईडीकडून तपास केला जातो. पण 9 अब्ज रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी तुम्ही कोणती यंत्रणा आणणार? त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+