वाल्मिक कराड असलेल्या पोलिस ठाण्यात अचानक पलंग कसे आले ? रोहीत पवारांचा सवाल ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्हा मागील काही दिवसापासून चर्चेत आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मीक कराड पोलिस कोठडीत आहेत. न्यायलयाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाल्मिक कराड हे (ता.31) डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत केज येथील न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याचसोबत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

MLA Rohit Pawar

फोटो सौजन्य- पीटीआय

सरकारकडून आता आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलचं रान पेटवलं आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट करुन खळबळून उडवून दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा". अशी खोचक पोस्ट रोहीत पवार यांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला झाली होती हत्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर काही तासातंच त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे समजला जाणाऱ्या वाल्मिक कराड याचे नाव आले आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं आहे.

वाल्मीक कराडवर खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. सरकारने वाल्मीक कराडस या प्रकरणातील इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाल्मीक कराड काल 31 डिसेंबर रोजी सीआयडी कार्यालयात शरण आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+