बीडसारखं आमचंही घर जाळण्याचा प्लॅन रचताय का..? - आमदार राजेंद्र राऊत यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

MLA Rajendra Raut's challenge to Manoj Jarange :मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वादविवाद आता वाढतच चालला आहे. आता आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे समर्थकाला जरांगे यांची बाजू घेत असल्यावरुन गुंडाकरवी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.त्यानंतर आता राजेंद्र राऊत यांनीही या आरोपाला उत्तर देत मनोज जरांगेंवर निशाणा साधला असून बीडसारख आमचेही घर जाळण्याचा प्लॅन रचताय का असा सवाल केलायं. तसंच कुठं उभं राहू तुम्ही कुठं गोळ्या घालणार सांगा..असं चॅलेंजही केलं आहे.

मनोज जरांगे यांच्या समर्थकाला आमदार राजेंद्र राऊत यांनी गुंडाकरवी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहेत. यावरुन काल केजमधील सभेत मनोज जरांगे यांनी या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील आरोपींना अटक करायला हवी आणि मारहाण झालेल्या तरुणाला न्याय द्यायला हवा असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

MLA Rajendra Raut s challenge to Manoj Jarange

काय म्हणाले होते मनोज जरांगे..?

मारहाण झालेल्या प्रकरणातील तरुणाला न्याय द्यायला हवा. आरोपींना अटक करायला हवी. जर या तरुणाला न्याय दिला नाही तर त्याच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा आम्ही मराठे म्हणून हिशोब घेऊ. गर्वाचे घर खाली करु. फितुरी करण्याचे नियतीला मान्य नाही.

काय म्हणाले राजेंद्र राऊत?

आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोप फेटाळून लावत मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मुळातः जरांगेदादांच्या डोळ्यावर काळी पट्टी आलेली दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुळ मुद्दा भरकटत चालला आहे. जरांगेंना प्रत्येक मतदारसंघातील विरोधक चुकीची माहिती देत आहेत. त्यांच्याच भाषणात ते म्हणतात इथे तिथे उपोषण करतो पण मुळातः त्यांनी उपोषण तरी करावं.

कुठं उभा राहू तुम्ही कुठं गोळ्या घालणार सांगा..

राजेंद्र राऊत म्हणाले की,ज्या दिवशी शरद पवारांची बार्शीत सभा झाली, शरद पवार आमच्या सोपल साहेबांच्या घरी गेले त्यादिवशीपासून बार्शीत गोंधळ सुरु झाला आणि जरांगेदादांनी मला टार्गेट करायला सुरुवात केली. प्रत्येकाला ते म्हणत आहेत की, सुपारी घेतली सुपारी घेतली...मग जरांगे दादांना मी विचारतो की, हा कुठला प्रकार आहे की आमच्या लेकरांना रडवेल असे ते म्हणत आहेत. बीड सारखा घर जाळण्याचा प्लॅन केलाय का..आम्ही कुठं उभा राहू, कुठं तुम्ही गोळ्या घालणार सांगा...असा सवालही त्यांनी केला.

एवढी दादागिरी केली तर कसं होईल..

राजेंद्र राऊत म्हणाले की, मनोज जरांगे याला बघतो, त्याला बघतो म्हणतात. गोळ्या-बिळ्या घालून मारुन टाका राजकारण करणाऱ्यांना याला पाडतो त्याला पाडतो असं कसं म्हणता. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालतो. एवढी दादागिरी केली तर कसं होईल...

आमदार राऊत विरोधात सोलापुरात आंदोलन

दरम्यान सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. आमदार राऊत जरांगेंवर टीका करत असल्यानं हे आंदोलन सुरु आहे. आमदार राऊत यांची वक्तव्य अशीच सुरु राहीली तर गनीमी काव्यानं उत्तर देऊ असा इशाराही मराठा संघनांकडून देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+