धक्कादायक! शिंदे गटाचा आमदार अडचणीत; विनयभंग व मारहाण केल्याचा महिलेचा आरोप

शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुव्याचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी हे अडचणीत आले आहेत. आ. पाडवी यांच्यावर एका महिलेने मारहाण व विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आरोप करणारी महिला व तिचा भाऊ हा तेथील स्थानिक भाजपचा कार्यकर्ता असल्याने आता भाजप व शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

MLA Amsha Padvi

सोरापाडा गावात नेमकं काय घडलं?

भाजपचा पंचायत समिती सदस्य असलेल्या एका व्यक्तीचा व आमदार आमशा पाडवी कुटुंबाचा हा वाद आहे. ग्रामपंचायत व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात काम केल्याचा आरोप करत या दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. त्यानंतर आ. पाडवी यांच्या कुटुंबातील व्यक्तीने आमच्या परिवाराला मारहाण केल्याचा आरोप त्या कुटुंबाने केला होता. याच प्रकरणातून आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य शंकर पाडवी, मुलगी संरपंच अंजू पाडवी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच महिलेने आमदार पाडवी यांनीही मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

परस्परविरोधी तक्रारी दाखल

या महिलेच्या तक्रारीनंतर आ. पाडवी यांची मुलगी व सरपंच अंजू पाडवी यांनीही पोलिसांमध्ये जात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजपा तालुकाध्यक्ष नितेश वळवी यांच्यासह आरोप करणारी महिला आणि तिच्या भावाविरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष समोर आला आहे.

आमदार पाडवी यांची अडचण वाढणार

येत्या पाच तारखेला मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. महायुतीमधील म्हणजेच शिंदे गटातील काही नेतेही त्यावेळी शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. मात्र आता आ. पाडवी यांच्यावर महिलेने आरोप केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+