धक्कादायक! मुंबईत सायन हाॅस्पिटलमध्ये मध्यरात्री महिला डाॅक्टरला मद्यधुंद रुग्ण, नातेवाईकांची मारहाण
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान, मुंबईतील सायन रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरवर मद्यधुंद रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केला. महिला डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आता हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. निवासी महिला डाॅक्टरच्या जबानीवर दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास महिला डॉक्टर वॉर्डात ड्युटीवर असताना हा प्रकार घडला. सायन-मार्ड आणि बीएमसी-मार्डचे सरचिटणीस डॉ. अक्षय मोरे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेची संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, रुग्ण मध्यरात्रीनंतर मद्यधुंद अवस्थेत 7-8 नातेवाईकांसह अपघातग्रस्त स्थितीत पोहोचला होता.
#WATCH | Maharahstra: On the alleged attack on a female resident doctor of Mumbai's Sion Hospital, Dr Akshya More, General Secretary of Sion-MARD and BMC-MARD, says, "... The patient arrived in casualty after midnight in an intoxicated state with 7-8 relatives. He was involved in… pic.twitter.com/CH4tSMoic6
— ANI (@ANI) August 18, 2024
डॉक्टर मोरे यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात येण्यापूर्वी या लोकांनी त्यांना मारहाण केली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. त्याच्या दुखापतीमुळे त्याला पहाटे साडेतीन वाजता ईएनटीमध्ये रेफरल करण्यात आले. ईएनटी विभागात आमची ऑन-कॉल एक निवासी डॉक्टर महिला होती. तेथे तैनात असलेल्या महिला डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि जखमांची तपासणी करण्यासाठी त्यांनी पट्टी उघडली.
डॉक्टर मोरे यांनी सांगितले की, ही नेहमीची प्रक्रिया आहे, मात्र यादरम्यान रुग्णाने महिला डॉक्टरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर रुग्णाला थांबवण्याऐवजी त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी महिला डॉक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. परिचारिकांनी हस्तक्षेप केला पण खूप उशीर झाला होता.
यादरम्यान रुग्णाने महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावर रक्ताने माखलेल्या बँडेजही लावल्या. पण, सुरक्षा कर्मचारी तेथे पोहोचेपर्यंत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पळून गेले होते. सकाळी सातच्या सुमारास महिला डॉक्टर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. महिला डाॅक्टरच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications