Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहि‍णींवर सरकार मेहरबान; जानेवारीचा हप्ता कधी? २१०० कधी मिळणार? थेट तारखाच आल्या समोर

विधानसभा निवडणुका संपल्या तरीही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची चर्चा कमी झालेली नाही. सुमारे सव्वा दोन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने ही योजना आत्तापर्यंतची सर्वात मोठी योजना असल्याचे सांगितले जातेय. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेत लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न वारंवार विचारला गेला होता. आता याच प्रश्नांचे उत्तर समोर आले आहे.

Ladki Bahin Yojana

जानेवारीचा हप्ता कधी?

मंत्री अदिती तटकरे यांना जानेवारीच्या हप्त्याबाबत विचारणा कऱण्यात आली. त्यावेळी त्यांनी जानेवारीचा हप्ता कधी मिळेल हे सांगितले. मंत्री तटकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या २६ जानेवारीच्या आत महिलांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२१०० रुपये कधी मिळणार?

महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याबाबतही वारंवार प्रश्न विचारला जातो. आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रश्नाला पुन्हा उत्तर दिले. महायुती सरकारने निवडणुकांदरम्यान जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. याशिवाय महिलांना लवकरच २१०० रुपये मिळतील, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

तटकरे काय म्हणाल्या?

आगामी अर्थसंकल्पात २१०० रुपये मिळण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच जाहिर केलं आहे. पुन्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हेच उत्तर दिलं. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+