मिलिंद नार्वेकरांनी सपत्नीक घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, व्यक्त केली मनोकामना
देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला पुण्याच्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी चौथ्या दिवशीही गर्दी केली आहे. अनेक राजकीय नेतेमंडळीं तसेच सेलिब्रिटी आणि प्रशासकीय अधिका-यांनीहीही दगडूशेठच्या गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या चरणी लीन होण्यासाठी गणपतीच्या चौथ्या दिवशी, शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) मिलिंद नार्वेकर यांनी पत्नी सह दगडूशेठ हलवाई गणपती ची आरती केली
दिग्गजांची दर्शनाला हजेरी
पिंपरी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेऊन आरती केली.
काल तिस-या दिवशी अभिनेता विवेक ओबेरायने दर्शनाला हजेरी लावली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दगडूशेठ गणपती चे दर्शन घेऊन आरती केली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही दर्शन घेऊन आरतीही केली. तसेच सहकार आणि पणनचे मुख्य सचिव अनुपकुमार लीना श्रीवास्तव( आयटीआयआरएस) यांनी दर्शन घेतले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आरती केली. रविवारी अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

जटोली येथील 'श्री शिव मंदिर'चा देखावा यंदाचे आकर्षण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील 'श्री शिव मंदिर'चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोतस्वात भारतातील विविध मंदिरे, राजप्रासाद यांच्या प्रतिकृती साकारते. देशातील सांस्कृतिक परंपरेचे जतन करून राष्ट्रीयत्वाची भावना वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीने केला जातो. या वर्षीच्या गणेशोत्सवात संस्थेतर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली येथील 'श्री शिव मंदिर' हा देखावा उभा केला आहे.
नयनरम्य विद्युत रोषणाईने तो नटविण्यात आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले यात 35000 महिलांनी भाग घेतला याशिवाय,हरी जागर, सामूहिक अग्निहोत्र, ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक, महाअभिषेक, गणेश याग, सत्यविनायक पूजा, मंत्र जागर यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामूहिक सूर्यनमस्कारांचे करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications