शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! आदित्य ठाकरेंना धोबिपछाड करण्यासाठी 'या' विद्यमान खासदाराला मैदानात उतरवलं!

वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना धोबिपछाड करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. राज्यसभेचे विद्यमान खासदार मिलींद देवरा यांना मैदानात उतरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

त्यामुळे वरळी मतदारसंघातून तिरंगी लढत होणार आहे. कारण, या ठिकाणी मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

Milind Deora vs Aditya Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघात पराभव करण्यासाठी महायुतीने मेगा प्लॅन आखला. आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबर रोजी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पण यावेळी महायुती व मनसेने आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्याअंतर्गत त्यांनी मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात स्वत: मिलिंद देवरा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचा विजय पक्का -संजय राऊत

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वरळीतून अमित शहांचे चिरंजीव मैदानात उतरले तरी आदित्य ठाकरे यांचा विजय पक्का असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाने वरळी येथून खासदाराला उमेदवारी द्यावी किंवा एकनाथ शिंदे यांनी स्वतः वरळीत उतरावे. ही जागा एवढी महत्त्वाची असेल तर थेट जय शहा यांनाच त्यांनी येथून उमेदवारी द्यावी, असे ते म्हणालेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+