MHT CET Result 2025 declared : एमएचटी सीईटी PCM ग्रुपचा निकाल जाहीर, एकाच क्लिकवर सर्व डिटेल्स वाचा

MHT CET Result 2025 declared today : 'एम एच सीईटी' राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेल, महाराष्ट्रतर्फे आज १६ जून रोजी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (PCM) या गटाचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर निकाल डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. पीसीएम परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.

उद्या १७ जून २०२५ रोजी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (PCB) चा निकाल जाहीर करणार आहे. जाहीर झाल्यानंतर पीसीबी गट परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.

MHT CET Result 2025 declared today

असा बघा निकाल...

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पृष्ठाच्या उजव्या बाजूला "MHT-CET निकाल २०२५" वर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल.
  • तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड करा.

पीसीएम ग्रुपसाठी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

महाराष्ट्र MHT CET 2025 परीक्षेला एकूण ७,६५,३३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६,७५,६०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटासाठी ४६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. PCM गटातील ४२२,८६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

कट ऑफ मार्कलिस्ट कधी येणार?

सीईटी सेल लवकरच कट ऑफ मार्कलिस्टची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करेल. यासंदर्भात लवकरच ही माहितीही सेल वेबसाईटवर कळवेल.

निकालानंतर ४० हरकती वैध

MHT CET 2025: प्रोव्हिजनल उत्तरतालिका आणि हरकतींचे अपडेटही राज्य सामाईक परिक्षा कक्षाने दिली आहे. त्यानुसार, MHT CET 2025 साठी पीसीएम गटाची प्रोव्हिजनल उत्तरतालिका 21 मे रोजी आणि पीसीबी गटासाठी १८ मे रोजी जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या हरकतींपैकी ४० हरकती वैध ठरल्या, आणि त्यावर संबंधित विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्यात येणार आहेत.

निकाल लागला आता पुढची प्रक्रिया काय?

पीसीएम म्हणजेच फिजिक्स-केमेस्ट्री - मॅथ विषयाचा एका गटाचा निकाल लागला आहे. यामुळे आता उद्या पीसीबी गटाचा निकाल लागेल त्यानंतर महाराष्ट्र राज्य सामाईक परिक्षा कक्ष विद्यार्थ्यांचे समुपदेशन राऊंड सुरु करणार आहे. या राऊंडचे अपडेट्स आणि तारखा सीईटी सेल अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपडेट्सकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

हेही वाचा : NEET UG result 2025 : 'नीट' चा निकाल जाहीर, किती असू शकते कट ऑफ लिस्ट, निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+