Mhada Lottery 2025 : पुण्यात 'स्वप्नातील' घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडा लॉटरीसाठी कसा करायचा अर्ज?
MHADA Pune Lottery 2025 : पुणे शहरात स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने नुकतीच पुणे आणि आसपासच्या परिसरातील घरांसाठी २०२५ ची लॉटरी जाहीर केली आहे.
या लॉटरीमध्ये एकूण 4,186 घरांचा समावेश असून, त्यापैकी 1,982 घरे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर उपलब्ध आहेत. या लॉटरीतील सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सर्वात स्वस्त घरे कुठे आणि किती किमतीची?
म्हाडाच्या या लॉटरीमध्ये दोन ठिकाणी अत्यंत कमी किमतीची घरे उपलब्ध आहेत.
१. २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
या योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील 'रोहन आनंद फेज १' या प्रकल्पात घरे उपलब्ध आहेत.
- योजनेचा संकेत क्रमांक: ८१३-ए/बी
- घरांचा प्रकार: १ आरके / १ बीएचके (EWS/LIG)
- अंदाजित किंमत: ९,९५,९०० ते १२,०३,९०० रुपये
- बांधकाम क्षेत्रफळ: ३४.६१ ते ४१.८७ चौ.मी.
- चटई क्षेत्रफळ: २३.६० ते २९.०२ चौ.मी.
- उपलब्ध सदनिका: ६४
२. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजना
या योजनेत चाकण, ता. खेड, जि. पुणे येथील 'सर्वे नं. ८१८ (PMAY)' प्रकल्पात सर्वात स्वस्त घर उपलब्ध आहे. या घराची किंमत ७ लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.
- योजनेचा संकेत क्रमांक: ८६७-बी
- घराचा प्रकार: १ आरके
- अंदाजित किंमत: ६,९५,००० रुपये
- बांधकाम क्षेत्रफळ: २७.७४ चौ.मी.
- चटई क्षेत्रफळ: २३.७४ चौ.मी.
- उपलब्ध सदनिका: ३
महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात: ११ सप्टेंबर २०२५ (दुपारी १२.३० पासून)
- ऑनलाइन अर्ज आणि रक्कम भरण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११.५९ पर्यंत)
- RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: १ नोव्हेंबर २०२५ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
- सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी: ११ नोव्हेंबर २०२५ (सायंकाळी ६ पर्यंत)
- अंतिम यादीची प्रसिद्धी: १७ नोव्हेंबर २०२५ (सायंकाळी ६ पर्यंत)
- लॉटरीचा निकाल: २१ नोव्हेंबर २०२५ (दुपारी १२ वाजता)
- यशस्वी अर्जदारांची नावे प्रसिद्ध करणे: २१ नोव्हेंबर २०२५ (सायंकाळी ६ पर्यंत)
दोन्ही वेबसाईडट्सला द्या भेट!
'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडाने lottery.mhada.gov.in या वेबसाइटसोबतच bookmyhome.mhada.gov.in ही स्वतंत्र वेबसाइटही विकसित केली आहे. त्यामुळे, इच्छुक अर्जदारांनी या दोन्ही वेबसाइट्सना भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी.












Click it and Unblock the Notifications