तुमच्या स्वप्नातलं घर अवघ्या 9 लाखांपासून! कल्याणमध्ये म्हाडाची सर्वाधिक 3,641 घरं! वाचा सविस्तर
MHADA Lottery 2025 : 'म्हाडा' सामान्यांच्या हक्काच्या घरासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. म्हाडाने अनेकांच्या घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. म्हाडाचे घर मिळणे ही अनेकांच्या जीवनातील एक मोठी आणि महत्वाची घडामोड असते, विशेष म्हणजे किमतीही कमी, म्हणूनच..आता तुमचे घराचे स्वप्न पुर्ण करण्याची संधी तुमच्या हातात आहे. तेही अवघ्या नऊ लाखांपासून होय..विश्वास बसणार नाही पण म्हाडाच्या लाॅटरीमध्ये तुमच्या कल्याणमध्ये सर्वाधिक घरं आहेत.
प्राप्त माहितीनुसार, म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे ही कल्याणमध्ये आहेत, येथील किमतीही अवाक्यात असणार आहेत. कल्याणमध्ये, 9 लाखात घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडाची ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबईसाठी लाॅटरी
म्हाडाने ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई भागात जवळपास 5, 362 घरे आणि भूखंडांसाठी लॉटरी काढली आहे. या सोडतीतून तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ही डिटेल्स वाचणे आवश्यक आहे. या लॉटरीतील सर्वाधिक घरे ही कल्याणमध्ये असून त्याची एकूण संख्या ही 3,641 इतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किमती या 9 लाखांपासून सुरू होत असून 35 लाखांपर्यंत आहेत.
समजून घ्या कल्याणमध्ये कोणत्या भागात किती किमतीमध्ये घर?
1. म्हाडा लाॅटरीत कल्याणमध्ये धारवानी प्रॉपर्टीचे अल्प उत्पन्नातील एकूण 6 घरे उपलब्ध आहेत. या घरांची किंमत 22,41,000 किंमत इतकी आहे.
2. म्हाडा लाॅटरीत गौरी विनायक बिल्डर्स तिसगाव यांची कल्याणमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 7 घरं आहेत.या घरांची किंमत 9,55,800 ते 11,32,100 इतकी आहे.
3. म्हाडा लाॅटरीत शिरढोण येथे अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 525 घरे आहेत. या घरांची किंमत 35 लाख 66 हजार 689 इतकी आहे.
4. टिटवाळा कल्याण येथे अभिदर्शन कॉर्पोरेशन- एल एल पी,ची अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 56 घरं आहेत. या घरांची किंमत 19 लाख 60 हजार 900 ते 19 लाख 95 हजार 400 एवढी आहे.
5. मॅक्रो टेक डेव्हलपर्स, घारीवली, कल्याण (लोढा डेव्हलपर्स) येथे अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 2 हजार 429 घरं आहेत. या घरांची किंमत 21 लाख 37 हजार 770 ते 21 लाख 98 हजार 200 रुपये आहे.
6. होराईझन प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड, उमरसर सांडप , ठाणे (रुनवाल डेव्हलपर्स) ची अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांची स्किम आहे. येथे एकूण 432 आणि 141 असे एकू्ण 571 घरं आहेत. यातील अल्प उत्पन्नगटासाठीच्या घरांची किंमत 19 लाख 03 हजार 300 ते 19 लाख 13 हजार 800 रुपये आहे. तर अत्यल्प उत्पन्नगटासाठीच्या घरांची किंमत 13 लाख 40 हजार 500 रुपये आहे.
7. सिझन सहारा, आडीवली, पिसवली , कल्याण येथे अल्प उत्पन्न गटासाठी एकूण घरे 37 इतकी आहेत. या घरांची किंमत 18 लाख 90 हजार 600 ते 25 लाख 75 हजार 100 एवढी आहे.
15 जुलैपासून सोडतीचे वेळापत्रक
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व दस्तऐवती सुरुवात 15 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून सुरु झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज पेमेंट स्वीकारण्यास आज 16 जुलै रोजी सकाळी 10:30 वा. पासून सुरु आहे. ऑनलाईन अर्जासाठी लॉटरीची शेवटची तारीख व वेळ 29 जुलै रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईनद्वारे शुल्क स्वीकारणीची शेवटची दिनांक व वेळ 30 जुलै 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.












Click it and Unblock the Notifications