म्हाडाचे घर घेताय! या स्किमसाठी PM आवासचे अडीच लाख मिळणार! छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये 1408 फ्लॅट
MHADA Lottery 2025 : जर तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर आणखी संधी आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नाशिक विभागात अर्ज करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे म्हाडातर्फे सोडत यंदा जून १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंड लाॅटरीत समाविष्ट आहे. या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

म्हाडाच्या लाॅटरीसाठी 26 सप्टेंबर, 2025 रोजी सोडत
म्हाडाच्या लाॅटरीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची 26 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.
कुठे कुठे आहेत म्हाडाचे फ्लॅट?
नक्षत्रवाडी (छत्रपती संभाजीनगर), अंबाजोगाई, नाशिकमध्ये सदनिका
छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे सोडत जुन-२०२५ अन्वये १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंडाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०५६ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर व २४४ पैकी ९२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट अंबाजोगाई जि.बीड या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
'या' योजनेसाठी पीएम आवासचे मिळणार अडीच लाख
या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख इतके अनुदान अर्जदारांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे १० लाख ते १२.५० लाख रुपये या किंमतीत १ बीएचके सदनिका घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. अर्जदारांना अंदाजित डिसेंबर-२०२६ पर्यंत या सदनिकांचा ताबा मिळणार आहे.
चिकलठाणा - (छत्रपती संभाजीनगर)
छत्रपती संभाजीनगर शहराच्या अत्यंत मोक्याचे ठिकाण असलेल्या चिकलठाणा येथे म्हाडा योजनेअंतर्गत १५४ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना जालना रोड पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे रु.२७.००/- लक्ष ते रु.३४.००/- लक्ष या परवडण-वा किंमतीत अर्जदारांना २ बीचके सदनिका घेता येणार आहेत. या योजनाचा ताबा अर्जदारांना डिसेंबर-२०२५ पर्यंत देण्यात येणार आहे.
सातारा देवळाई परिसर (छत्रपती संभाजीनगर)
महाराष्ट्र शासनाच्या २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विविध योजनेतील बीड बायपासलगत सातारा परिसर व देवळाई येथील २१ सदनिका व १८ निवासी भुखंडाचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्जदारांना रु.१५.००/- लक्ष या किंमतीत सदनिका तसेच रु.५.००/- लक्ष या किमतीत भुखंड घेण्याची संधी उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख
या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री. ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अनामत रक्कमेचा भरणा करुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जाची दि. २६ सप्टेंबर, २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे.
कुठे कराल अर्ज?
अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता https://housing.mhada.gov.in किंवा https://www.mhada.gov.इन या संकेतस्थळास भेट द्यावी. या सोडतीकरिता मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले असून अर्ज नोंदणीकरिता - ०२२-६९४६८१००. ऑनलाईन पेमेंट करिता- १८००८९१८२९७,७०६६०४७२१२, [email protected] यावर संपर्क साधता येणार आहे. या सोडतीकरिता मंडळाने आपल्या विभागीय कार्यालयात तळमजल्यावर विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे.












Click it and Unblock the Notifications