म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी; कोकण मंडळात 5,285 फ्लॅट, 77 भूखंडासाठी या तारखेपर्यंत करा नोंदणी!
MHADA Konkan Lottery 2025 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा, वसई ,जिल्हा पालघर येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका आणि ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला दिनांक २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची सोडत आता दिनांक १८ सप्टेंबर २०२५ ला ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

नवीन वेळापत्रकानुसार सदर सोडतीसाठी दिनांक २८ ऑगस्ट २०२५ ला रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी ०७ सप्टेंबर, २०२५ ला सायंकाळी ६.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ ला सायंकाळी ०६ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक १६ सप्टेंबर २०२५ ला सायंकाळी ०६.०० वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ - ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
World Kidney Day 2026 : किडनी फेल होणार नाही यासाठी 'ही' काळजी घ्या; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी











Click it and Unblock the Notifications