सलग चौथ्या विजयासाठी शिवसेनेचे संजय रायमुलकर सज्ज, मेहकरमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराशी सामना!
Mehkar Assembly Election 2024 : परंपरागतरीत्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेला साथ दिली आहे. 1995 ते 2009 या काळात प्रतापराव जाधव यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2009 पासून आतापर्यंत संजय रायमुलकर या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवीत आहेत. सलग तीन वेळा मेहकर जिंकणाऱ्या संजय रायमुलकर यांनी 2022 साली झालेल्या शिवसेनेतील बंडाळीत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि शिंदे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मेहकर विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले.
सामान्य शिवसैनिक म्हणून कारकिर्दीला सुरुवात
एक सामान्य शिवसैनिक म्हणून संजय रायमुलकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली. एक आक्रमक आणि जनहितासाठी धडपडणारा शिवसैनिक अशी ओळख अल्पावधीतच त्यांनी निर्माण केली. प्रतापराव जाधव आमदार असताना संजय रामुलकर यांनी संघटना विस्ताराकडे विशेष लक्ष दिले त्यामुळे प्रतापराव जाधव लोकसभेवर निवडून गेल्यानंतर संजय रायमुलकर यांनाच पक्षाने संधी दिली आणि रायमुलकर यांनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. 2008 साली मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष झालेल्या संजय रायमुलकर यांनी नंतर मागे वळून पाहिले नाही आणि सलग तीन वेळा विधानसभेत प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून शिवसेनेचे संजय रायमुलकर, उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात, वंचित बहुजन आघाडीच्या ऋतुजा चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भैय्यासाहेब पाटील असा सामना रंगणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने जिंकल्यामुळे संजय रायमुलकर यांच्यासाठी ही एक जमेची बाजू आहे.
आरोग्य सेवेच्या सुधारणेकडे लक्ष
आमदारकीच्या आपल्या सलग तीन कारकीर्दींमध्ये संजय रायमुलकर यांनी मेहकर आणि लोणार तालुक्यातील आरोग्य सेवेत पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. दोन्ही तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी 45 कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहेत. तसेच ट्रॉमा केअर सेंटर साठी सुमारे नऊ कोटी रुपये देण्यात आले असून उपकेंद्रातील सुविधांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी पुरवठ्यासाठी भरीव निधी
मेहकर शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 74 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत तसेच अमृत योजनेच्या अंतर्गत 38 कोटी रुपयांची तरतूद मेहकर शहरासाठी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लोणार तालुक्यात पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य सरकारने 171 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विविध विभागांच्या माध्यमातून मेहकर आणि लोणार तालुक्यात रस्ते बांधणीसाठी 1440 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या माध्यमातून दोन्ही तालुक्यात वाहतुकीची आणि दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारसंघाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे गती मिळत आहे.
सिंचनाच्या योजनांसाठी प्रयत्न
संजय रायमुलकर यांनी सिंचनाच्या सुविधांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून पेनटाकळी प्रकल्पातून मुख्य कालव्यासाठी 72 कोटी रुपये देण्यात आले आहेत तसेच कोराडी योजनेतील कालव्याच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मृदा आणि जलसंधारण मंत्रालयाकडून 178 कोटी रुपयांचा निधी संजय रायमुलकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी प्राप्त करून घेतला आहे.
कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारण्यासाठी आणि जलाशयांसाठी या निधीचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून 135 कोटी रुपयांचा निधी मेहकर आणि लोणार तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि या निधीचे अंतर्गत विविध प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना आहे. पात्र लाभार्थी महिलांना या योजनेच्या अंतर्गत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचे तीन हप्ते महिलांना अदा करण्यात आले आहेत. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी मेहकर विधानसभा मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी संघटनेच्या माध्यमातून करून घेतली आहे. तसेच राज्य सरकारने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आणलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यावर रायमुलकर यांचा भर आहे.
पारडे जड
मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन विजयांचा प्रदीर्घ अनुभव, या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात असलेला प्रचंड लोकसंपर्क, गेल्या पंधरा वर्षात राबवलेली विकास कामे, राज्य सरकारच्या विविध योजना आणि विरोधी मतांचे विभाजन या संजय रायमुलकर यांच्या पथ्यावर पडणाऱ्या बाबी असल्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात त्यांचे पारडे थोडे जड मानले जात आहे.
-
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
अदानी टोटल गॅसकडून CNG आणि घरगुती PNG चे दर स्थिर; काही उद्योगांच्या पुरवठ्यात कपात -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
सावधान! महाराष्ट्राचा पारा चढला; पुढील 48 तास उष्णतेचा 'हाय अलर्ट', जाणून घ्या IMDचा अंदाज काय? -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग! -
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा









Click it and Unblock the Notifications