शिवसेनेच्या आमदारांची बोलावलेली बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची चर्चा!
Eknath Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहून मुख्यमंत्री यांची प्रकृती खराब असल्याने ते दोन दिवस त्यांच्या मुळगावी दरे या ठिकाणी गेले होते. दरम्यान,एकनाथ शिंदे हे कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानीच राहणार आहेत.

महायुतीची बैठक देखील रद्द झाली?
दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, एकनाथ शिंदेंनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.
दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारी नेते सागर बंगल्यावर पोहोचत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आजही सागर बंगल्यावर नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन तसंच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत.












Click it and Unblock the Notifications