मोठी बातमी! मेडीकल PG विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10 हजारांची वाढ, B.Sc नर्सिंग स्टुडंटला 8 हजार

Medical PG students' stipend increased by 10 thousand : राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ करण्यात आली असून पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10 हजारांची वाढ करण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी 10 जून 2025 मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला, यासह अन्य विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Medical PG students  stipend increased by 10 thousand

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेडीकल पीजी स्टुडंट, भौतिकोपचार- व्यवसायोपचारचे विद्यार्थ्यांसोबत बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही 8 हजारांचेे विद्यावेतन मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील हे निर्णय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांची मागणी होती. पीजी स्टुडंटच्या विद्यावेतनासंदर्भात मार्डकडून यासंदर्भात अनेकदा आंदोलनेही झाली होती.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय Medical PG students' stipend increased

  • महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)
  • राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यासोबतच, राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६ हजार २५० रुपयांची वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यात, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रूपयांची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही ८ हजार रूपये इतके विद्यावेतन मिळणार आहे. याशिवाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+